जळगावएका तासापूर्वी
Advertisement
- कॉपी लिंक
पहूर येथील दोन पोलिस कर्तव्यावर असताना १४ जानेवारीला त्यांना दाेन जणांनी मारहाण केली होती. या दोघांना पहूर पोलिसांच्या पथकाने परळी जवळील जंगलातून अटक केली. दोघांना शुक्रवारी जामनेर न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस काेठडी सुनावली आहे, तर या दाेघांची शनिवारी पहूर पोलिसांनी गावातून धिंड काढली.
Advertisement
पोलिस कर्मचारी अनिल सुरवाडे व वाहन चालक रवींद्र मोरे हे १४ जानेवारीला रात्री १० वाजेच्या सुमारास कर्तव्य बजावत असताना गावातीलच फिरोज शेख व ख्वाजा तडवी यांना दुचाकी बाजूला घे, असे सांगितले. याचा राग आल्याने या दोघांनी पोलिसांना मारहाण केली होती. त्यानंतर दोघे फरार झाले. त्यांना शोधण्यासाठी पथक बनवले. त्यांनी बीडच्या परळी मधील जंगलातून त्यांना पकडले.
Advertisement
बातम्या आणखी आहेत…
Advertisement