देशातील सर्वात मोठ्या विमानतळाची आज पायाभरणी: 5 फोटोंमध्ये पाहा जेवर विमानतळ बांधून पूर्ण झाल्यानंतर कसे दिसेल; येथे 178 विमाने एकाचवेळी उभी राहू शकतील


Advertisement

नवी दिल्ली39 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

आज म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची (जेवर विमानतळ) पायाभरणी होईल. हे जगातील चौथ्या क्रमांकाचे विमानतळ असेल. याच्या बांधकामासाठी 29 हजार 650 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. येथे एकाच वेळी 178 विमाने उभी राहू शकतील. फोटो प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला जेवर विमानतळाविषयी विशेष माहिती सांगत आहोत.

Advertisement

जेवर विमानतळाच्या उभारणीसाठी 29 हजार 650 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये येथून पहिले विमान उड्डाण करेल. जेवर विमानतळ 5845 हेक्टर जमिनीवर बांधण्यात येणार आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात ते 1334 हेक्टर जमिनीवर बांधण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात येथे दोन पॅसेंजर टर्मिनल आणि दोन धावपट्टी बांधण्यात येणार आहेत. नंतर येथे एकूण पाच धावपट्टी बांधण्यात येणार आहेत.

जेवर विमानतळ पूर्ण बांधून झाल्यानंतर, ते फ्लोरिडाच्या ऑर्लॅंडो आंतरराष्ट्रीय विमानतळाला मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाचे विमानतळ असेल. मात्र, किमान 2030 पर्यंत हे विमानतळ दिल्लीसारखे आंतरराष्ट्रीय स्वरूप घेऊ शकेल.

Advertisement

पहिल्या वर्षी सुमारे 40 लाख प्रवाशांची येथे गर्दी होणार आहे. 2025-26 मध्ये प्रवाशांची संख्या 70 लाखांपर्यंत असू शकते. दरवर्षी ही संख्या दुपटीने वाढण्याची अपेक्षा आहे. 2044 पर्यंत प्रवाशांची संख्या सुमारे 80 दशलक्ष असेल अशी अपेक्षा आहे.

येथे एकाच वेळी 178 विमाने उभी राहू शकतील. जसजशी हवाई वाहतूक वाढेल तसतसे अधिक धावपट्ट्या बांधता येतील. देशांतर्गत उड्डाणांमध्ये, 40 टक्के मागणी ही मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईसारख्या मेट्रो शहरांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांकडून आहे. त्यामुळे जेवर विमानतळावरून सुरुवातीला 8 देशांतर्गत उड्डाणे सुरू होणार आहेत.

Advertisement

हे विमानतळ चार द्रुतगती मार्ग, मेट्रो, बुलेट ट्रेन आणि पॉड टॅक्सीद्वारे जोडले जाईल. त्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये मेट्रो आणि बुलेट ट्रेनचे स्थानक बांधले जाणार असून, त्यामध्ये विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रत्येक सुविधेची काळजी घेण्यात आली आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here