देशाच्या शाळांतील शिक्षण: 15 लाख शाळांत 26 कोटी विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवताहेत 96 लाख शिक्षक


Advertisement

नवी दिल्ली14 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • आपली शालेय शिक्षणव्यवस्था जगातील सर्वात मोठी शिक्षणप्रणाली मानली जाते..

भारतात जगातील सर्वात मोठी शिक्षणप्रणाली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी ही बाब सांगितली तेव्हा त्यांनी यासाठी ठोस आकडेही मांडले. जसे की- शहरी भागात २.४९ लाख, तर गावांत १२.५८ लाख शाळा आहेत. या शाळांमध्ये शिकत असलेल्या २६ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यात ९६ लाखांवर शिक्षक कार्यरत आहेत. यात महिला शिक्षकांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. महिला शिक्षकांची संख्या ४९.२, तर पुरुष शिक्षकांची संख्या ४७.७१ लाख आहे.

Advertisement

तथापि, जागतिक शिक्षणव्यवस्थेत गुणवत्तेत भारत ३३ व्या स्थानी येतो. हे रँकिंग तीन मानकांच्या आधारावर दिले जाते. चांगल्या रीतीने विकसित पब्लिक एज्युुकेशन सिस्टिम, चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण आणि किती लोक उच्च शिक्षण घेत आहेत. या आधारे क्वालिटी इंडेक्समध्ये भारताला २०२० मध्ये ५९.१ गुण मिळाले होते, तर अपॉर्च्युनिटी इंडेक्समध्ये भारताला ४८.२१ गुण मिळाले होते. तज्ज्ञांच्या मते इतक्या मोठ्या शिक्षणव्यवस्थेत संथगतीने पण योग्य सुधारणा होत आहे. २०१८-१९ च्या तुलनेत २०१९-२० मध्ये शालेय शिक्षण, विद्यार्थी – शिक्षक रेशो, मुलींच्या नामांकनाच्या सर्वच स्तरांत सुधार झाला आहे. शिवाय वीज, कॉम्प्युटर आणि इंटरनेट सुविधा असलेल्या शाळांच्या संख्येत वाढ झाली आहे. भारतात शालेय शिक्षणासाठी २०१९-२० च्या संयुक्त जिल्हा माहिती प्रणाली प्लस (UDISE+) च्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. २०१९-२० मध्ये पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिकपर्यंत शालेय शिक्षणात एकूण विद्यार्थ्यांची संख्या २६.४५ कोटींवर पोहोचली आहे. ती २०१८-१९ च्या तुलनेत ४२.३ लाख अधिक आहे. अहवालानुसार शालेय शिक्षणाच्या सर्वच स्तरांत नामांकन रेशोत सुधारणा आहे.

एकूण शिक्षकांत महिला ५१ टक्के
देशातील शाळांमध्ये २०१२-१३ च्या तुलनेत २०१९-२० मध्ये शिक्षकांच्या संख्येत चांगली वाढ दिसून आली. २०१८ सोबत तुलना करून बघितल्यास तेव्हा देशात ९४.३ लाख शिक्षक होते. २०१९- २०२० येईपर्यंत या संख्येत २.५ लाखांची वाढ झाली आहे. मजेशीर बाब म्हणजे देशात महिला शिक्षकांची संख्या पुरुषांच्या तुलनेत अधिक वाढत आहे. २०१३ मध्ये देशातील पुरुष शिक्षकांची संख्या अधिक होती, परंतु आता महिला शिक्षकांची संख्या अधिक झाली आहे. महिला शिक्षकांची हिस्सेदारी ४७%हून वाढून ५१% झाली आहे. २०१२-१३ मध्ये महिला शिक्षकांची संख्या ३५.८ लाख होती, जी आता वाढून ४९.२ लाख झाली. तथापि, यादरम्यान पुरुष शिक्षकांची संख्या ४२.४ लाखांहून वाढून ४७.७ लाख झाली आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here