मुंबईएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एक भीषण अपघात झाला असून, त्यात एक रॉड कारच्या आरपार केला. मात्र, देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय येथे आला. या कारमधील सारे प्रवासी सुखरूप असून, एक जण जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णावर उपचार सुरू असल्याचे समजते. सोमाटणे फाट्यावर हा अपघात झाला.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर काल उर्से टोलनाक्याजवळ एक कराने ट्रकला मागून धडक दिली होती. त्यात तीन प्रवासी जागीच ठार झाले. त्यानंतर आजही या मार्गावर दुर्घटना घडली.
कारमधून डिव्हाइडरचा रॉड आरपार घुसला.
असा घडला अपघात
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज एका कारचा भीषण अपघात झाला. मार्गावरील डिव्हाइडरचा रॉड कारच्या मधून आरपार घुसला. त्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले. मागून काच फोडून घुसलेला रॉड पुढची काच फोडून बाहेर निघाला. यावरून या अपघाताची तीव्रता सहज लक्षात येईल.
कारमध्ये घुसलेला रॉड पुढची काच फोडून बाहेर निघाला.
एकावर उपचार सुरू
अपघातग्रस्त कारमधील सारे प्रवासी सुखरूप असल्याचे समजते. मात्र, एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. समृद्धी महामार्ग असो की मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग. या दोन्ही रस्त्यावर अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे चालकांनी सावध रहावे. वेगावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अपघातामध्ये कारमधील एक प्रवासी जखमी झाला आहे.
कारची ट्रकला धडक
मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर भरधाव कारची एका ट्रकला मागून जोरात धडक बसली. या भीषण अपघातात कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी आढे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला.
अपघात इतका भीषण होता की, त्यामुळे पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
कारचा चक्काचूर
एका मालवाहतूक ट्रकला भरधाव कारने पाठीमागून धडक दिली. यावेळी ट्रकच्या मागच्या बाजूने कार अडकली गेली. या भीषण धडकेत कारचा चक्काचूर झाला असून तिघांचा मृत्यू झाला आहे.
अपघातस्थळी नागरिकांनी धाव घेत जखमींना मदत केली.
जखमींवर उपचार सुरू
घटनेची माहिती मिळताच देवदूत बचाव पथक आणि स्थानिक पोलिस प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्से कॅम्पसमध्ये सकाळी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनीही अपघातस्थळी तातडीने धाव घेत मदत केली.
दोघे जागीच ठार
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी अपघात झाला. त्यात मुंबईहून भरधाव वेगात ही कार (MH 04 JM5349) पुण्याच्या दिशेने जात होती. दरम्यान, समोर असणाऱ्या ट्रकला (RJ 09 JB 3638) पाठीमागून जोरदार धडकली. ही धडक एवढी जोरात होती की चालकासह कारमधील दोन जण जागीच ठार झाले.
मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर कार ट्रकला पाठीमागून धडकली.
वाहतुकीवर परिणाम
मृतांमध्ये विजय विश्वनाथ खैर नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य दोन मृतांची नावे समजलेली नाहीत. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला मात्र पोलिसांनी खराब झालेले वाहन रस्त्यावरून हटवून पूर्वपदावर आणले. महामार्ग पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली यातील वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे.
अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला.