देवेंद्र फडणवीसांनी मोदी पर्व संपल्याच्या नांदीसह कबुली दिली, उद्धव ठाकरेंचा पलटवार

देवेंद्र फडणवीसांनी मोदी पर्व संपल्याच्या नांदीसह कबुली दिली, उद्धव ठाकरेंचा पलटवार


मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची नांदी आणि कबुली असल्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत भाषण करताना आपल्याला बाळासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेत सत्ता मिळवायची आहे म्हणत बाळासाहेबांच्या नावाने मते मागायचा केविलवाणा प्रयत्न केला . त्यांच्या या वक्तव्यामुळे देवेंद्रनी आता मोदींच्या नावाने मते मागून उपयोग होणार नाही हेच एकप्रकारे अधोरेखित केले, असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या नावानं मतं मागणं ही मोदी पर्व संपल्याचीच ही नांदी आणि कबुली आहे. भाजपच्या धोरणानुसार वापर संपला की नवीन नाव शोधायचे आणि त्यांच्या नावाने मते मागायची आणि आपली सत्तेची तळी भरायची असाच हा प्रकार आहे. या निमित्ताने भाजपचा खरा चेहरा देवेंद्र फडणवीस यांनी समोर आणला. महाराष्ट्रातील जनता याना मतपेटीतून याचे उत्तर देईलच, असा घणाघात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केला.

Advertisement

माझं शरीर अमजद खानसारखं, हे मला बच्चन म्हणतात, फडणवीसांची फटकेबाजी

मुंबईत भाजप शिवसेनेचा महापौर असेल

देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईचे नवनिर्वाचित अध्यक्ष आशिष शेलार यांचा सत्कार केला. पुढील निवडणुकीत मुंबईत भाजप आणि शिवसनेच्या युतीचा महापौर असेल, असं वक्तव्य केलं. भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुफान फटकेबाजी केली. भाजप ही एक टीम आहे. या नेत्यांनी भाषणात माझा उल्लेख अमिताभ बच्चन असा केला, पण माझं शरीर अमजद खान सारखं आहे, असं फडणवीस म्हटलं. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेवरही हल्लाबोल चढवला.

Advertisement

मुंबईत शिवसेना-भाजप युतीचाच महापौर असेल, फडणवीसांचा निर्धार



Source link

Advertisement