दुर्दैवी घटना: टूथपेस्ट ऐवजी चुकून उंदीर मारण्याच्या औषधानेच घासले दात, मुंबईतल्या 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू


Advertisement

मुंबई2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • मुंबईतील धारावी राहणाऱ्या अफसाना खान हिच्यासाठी रविवारची सकाळ ही काळ बनून आली.

मुंबईतील धारावी परीसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने एका 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे तिच्या कुटुंबियांना देखील मोठा धक्का बसला आहे.

Advertisement

सकाळची सुरुवात ही आपली दात घासण्यापासून होत असते. मात्र मुंबईतील धारावी राहणाऱ्या अफसाना खान हिच्यासाठी रविवारची सकाळ ही काळ बनून आली. तिने सकाळी दात घासण्यासाठी अनावधानाने टूथपेस्ट ऐवजी उंदीर मारण्याचे औषध ब्रशवर घेतले. तिने ब्रश करण्यास सुरुवात केली. पण तिला चव वेगळी लागल्याने तिने लगेच पेस्ट थुंकून तोंड धुवून घेतले. मात्र उंदीर मरण्याचे औषध हे क्षणार्दात शरीरात पसरल्यामुळे तिला त्रास होऊ लागला आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी धारावी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अफसाना ही सध्या शिक्षण घेत होती. मात्र तिचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्व स्वप्न अर्धवट राहिले आहे. तिच्या पार्श्चात तिची आई, वीस वर्षीय बहीण आणि दोन लहान भाऊ असे कुटुंब आहे. अफसानाची आई ही फळ विक्रीचा व्यवसाय करते. मात्र आता तिच्या अशा जाण्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here