पुणे32 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
पुण्यातील टिंबर मार्केट येथील लाकडाच्या गोदामाला आज पहाटे 4.14 वाजता भीषण आग लागली. सकाळी पावणे आठवाजेपर्यंत वाजेपर्यंत येथे आग धुसमत होती. अग्निशमन दलाचे 30 बंब घटनास्थळी आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. अखेर साडेतीन तासानंतर ही आग आटोक्यात आल्याची माहिती आहे.
पहाटे लाकडाच्या गोदामाला लागलेली भीषण आग.
मोठा धोका टळला
गोदामाच्या आजुबाजुला असलेल्या चार घरांनादेखील या आगीची झळ बसली. जवानांनी प्रथम ही आग शेजारील घरांमध्ये, शाळेमध्ये व परीसरामध्ये पसरू न देण्याची खबरदारी घेतली. आजुबाजुच्या परिसरातून 10 सिलेंडर तातडीने बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठा धोका टळला.
कोणीही जखमी नाही
दरम्यान, या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासमवेत इतर 20 अधिकारी व जवळपास 100 जवान आणि पुणे मनपा- पुणे कॅन्टोमेंट-पीएमआरडीए-पिंपरीचिंचवड अग्निशमन दल अशी एकुण जवळपास 30 अग्निशमन वाहने व खाजगी वॉटर टँकर घटनास्थळी दाखल आहेत. आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप समजू शकलेले नाही.
अग्निशमन दलाचे 30 वाहने घटनास्थळी आहेत.