पुणे20 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
दुचाकी चोरणाऱ्या महावितरणच्या वायरमनला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत.कुणाल सुरेश बधे (वय-29, रा. रांजणे ता. वेल्हा, जि. पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, अमृत खान, लिपाने वस्ती येथे एक जण चोरीची दुचाकी घेऊन थांबायची माहिती पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, हर्षल शिंदे, सचिन गाडे यांना बातमीदार मार्फत मिळाली होती. कुणाल बधे ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने भारती विद्यापीठ, कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे कबूल केले आहे. त्याच्याकडून 3 लाखांच्या 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तर इतर दोन दुचाकीची माहिती घेतली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस सह आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदशनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलिस निरीक्षक विजय पुराणिक, गिरीश दिघावकर सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ, पोलिस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, हर्षल शिंदे, सचिन सरपाले, चेतन गोरे, शैलेश साठे यांच्या पथकाने केली.
एकावर गुन्हा दाखल
कोथरूड येथे अंघोळ करताना घरमालकीन असलेल्या महिलेचे चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका 35 वर्षीय तरूणावर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 34 वर्षीय महिलेनी फिर्याद दिली आहे. दि. 5 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. त्याने चोरून व्हिडीओ बनविल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.