दुखापतीमुळं विराट कोहली दुसऱ्या कसोटीतून बाहेर, केएल राहुलकडं संघाचं नेतृत्व


Advertisement

Virat Kohli Misses Out Due To Upper Back Spasm: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर खेळला जात आहे. सरत्या वर्षांला धडाकेबाज कसोटी विजयासह निरोप दिल्यानंतर नव्या वर्षांत ऐतिहासिक शिखर सर करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालाय. यातच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या नाणेफेकीपूर्वी भारतीय चाहत्यांना धक्का देणारी माहिती समोर आलीय. दुखापतीमुळं भारताचा नियमित कसोटी कर्णधार विराट कोहली दुसऱ्या कसोटीतून बाहेर झालाय. विराच कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करीत आहे. 

विराट कोहलीच्या अनुस्थितीबद्दल विचारले असता केएल राहुल म्हणाला की,  विराट कोहली पाठीच्या दुखण्यानं ग्रस्त आहे. फिजिओ त्याच्यावर काम करत आहेत आणि आशा आहे की तो पुढच्या कसोटीसाठी वेळेत बरा होईल. तसेच कोहलीच्या जागी हनुमा विहारीला संघात स्थान देण्यात आल्याचंही त्यानं सांगितलं. याशिवाय, भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. 

Advertisement


Advertisement

 

भारतानं 1992 पासून दक्षिण आफ्रिकेत एकदाही कसोटी मालिका जिंकता आली नाही. आजचा सामना जिंकून भारतीय संघाकडं मोठी संधी उपलब्ध झालीय. ही संधी भारतीय संघ गमावणार नाही, अशी अपेक्षा केली जात आहे.  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात यश संपादन करून आफ्रिकन भूमीत प्रथमच कसोटी मालिका विजय साकारण्याची ऐतिहासिक संधी भारताला साद घालत आहे. भारतानं जोहान्सबर्ग मैदानावर आतापर्यंत चांगल प्रदर्शन करून दाखवलंय. भारतानं जोहान्सबर्ग मैदानावर भारतानं एकूण पाच कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी भारतानं दोन जिंकले आहेत. तर, तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. 

Advertisement

संघ: 
दक्षिण आफ्रिकेचा संघ: डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डर डुसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, कागिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर, लुंगी एनगिडी

भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

Advertisement

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP MajhaSource link

Advertisement