दीड वर्षानंतर वाद शमला, वरिष्ठांचा हिरवा कंदील: नाराजांना जिल्ह्यावर स्थान देत काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या निवडी

दीड वर्षानंतर वाद शमला, वरिष्ठांचा हिरवा कंदील: नाराजांना जिल्ह्यावर स्थान देत काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या निवडी


प्रतिनिधी | सोलापूरएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

जिल्हा काँग्रेसमधील तालुकाध्यक्ष निवडीचा वाद अखेर दीड वर्षानंतर शमला आहे. धवलसिंह माेहिते-पाटील हे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर हा वाद सुरू होता. त्यामुळे निवडी रखडल्या होत्या. ज्यांनी हरकती घेतल्या होत्या, त्यांना प्रमोशन देत जिल्हा काँग्रेस कमिटीवर स्थान दिले गेले आहे. या सर्व निवडी मंगळवारी जाहीर झाल्या.

Advertisement

प्रदेश काँग्रेस कमिटीची विस्तारीत कार्यकारिणीची बैठक मंगळवारी पार पडली. बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे आणि जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यातील चर्चेनंतर सर्व तालुकाध्यक्षांच्या निवडीला हिरवा कंदील मिळाला. त्यानंतर प्रदेश काँग्रेसचे संघटन व प्रशासन विभागाचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी निवडीच्या यादीचे पत्र धवलसिंह माेहिते-पाटील यांना सुपूर्द केले. तालुकाध्यक्षांच्या निवडी धवलसिंह मोहिते-पाटील यांनी जाहीर केल्यानंतर त्यावर वाद झाला. काही जणांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या कानावर ही बाब टाकली. तेव्हा शिंदेंनी नाना पटोलेंशी संपर्क साधून यादीला स्थगिती मिळवून दिली होता. तेव्हापासून हा वाद सुरूच होता. त्यातच परवा शहरात झालेल्या हुतात्मा स्मृती मंदिरातील मेळाव्यातून धवलसिंह मोहिते-पाटील मध्येच उठून गेल्यानंतर वेगळ्याच वादाची चर्चा रंगली होती. सायंकाळी त्यांनी शिंदेंच्या घरी जाऊन पटोले, पृथ्वीराज चव्हाण आदींना भेटून चर्चा केली. अखेर मंगळवारी हा सगळा वाद संपून यादी जाहीर झाली. शिंदे यांनी हा यादीला हिरवा कंदील देत नाराजांना जिल्ह्यावर घ्या अशी सूचना केली होती. त्यानुसार निवडी जाहीर झाल्याचे जिल्हा समन्वयक विजयकुमार हत्तुरे यांनी सांगितले.

पाच जणांना मिळाले जिल्ह्यावर स्थान

Advertisement

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष निवडी ज्यांच्यामुळे रखडल्या होत्या त्या मंगळवेढ्यातील नंदकुमार पवार, सुरेश शिवपुजे, संजय पाटील यांची जिल्हा उपाध्यक्षपदी तर सौदागर जाधव, सुनील मोरे यांची सरचिटणीस पदावर वर्णी लागली. तालुकाध्यक्ष असे

तालुकाध्यक्षांच्या यादीत श‌ंकर म्हेत्रे (अक्कलकोट), हरिष पाटील (दक्षिण सोलापूर), शालीवाहन माने देशमुख (उत्तर सोलापूर), प्रशांत साळे (मंगळवेढा), सुलेमान तांबोळी (मोहोळ), सतीश पाचकवडे (बार्शी, ग्रामीण), विजय साळुंखे (बार्शी, शहर), ऋषीकेश बोबडे (माढा), हणुमंत मोरे (पंढरपुर ग्रामीण), अमर सूर्यवंशी (पंढरपूर शहर) यांचा समावेश आहे.

AdvertisementSource link

Advertisement