दिव्य मराठी विशेष: 32 वर्षांनंतर पुन्हा अनुभवली शाळेतील मज्जा; ति. झं. विद्यामंदिरातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा, 73 विद्यार्थी आणि 17 शिक्षकांचा सहभाग


नाशिक2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या भगूर येथील ति. झं. विद्यामंदिर विद्यालयात तब्बल ३२ वर्षांनी १९८९ सालच्या दहावीला असलेल्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि त्यांना ज्ञानदान करणाऱ्या गुरुजनांचा स्नेहमेळावा शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.

Advertisement

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक विश्वास बोडके होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व आशीर्वाद देण्यासाठी राजाभाऊ भदाणे, रत्नाकर बकरे, धनसिंग परदेशी, श्रीमती धोपावकर, निर्मला वाघ, दिलीप अहिरे, प्र. ल. सोनी, के. डी. चौधरी, शिवाजी सोनवणे, नरेंद्र मोहिते, मधुकर पगारे उपस्थित होते.

३२ वर्षांनी शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सतत दहा वर्षे अनुभवलेली शाळा, मिळालेले ज्ञान, संस्कार, परिसराची पुन्हा आठवण करून गेला आणि सर्वांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला. सर्व शिक्षकांचेे फेटे बांधून, औक्षण करून फुलांची उधळण करत ढोल-ताशांच्या गजरात, स्वागतगीताने स्वागत करण्यात आले. कोविडने दिवंगत झालेल्या सर्वांचे स्मरण करून अभिवादन करण्यात आले. प्रकाश कर्डक यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. विश्वास बोडके व दिलीप अहिरे यांनी ३२ वर्षांत शाळेने, संस्थेने केलेली प्रगती, शाळेच्या विकासाबाबत व माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या यशस्वितेबद्दल मार्गदर्शन केले. अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Advertisement

प्रीती शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले तर नितीन उदावंत व रामा घोरपडे यांनी आभार मानले. नितीन उदावंत, अभय बलकवडे, संतोष मोहिते, शुभांगी गायकवाड, चित्रा बलकवडे, मनीषा लाहोटी, संजय करंजकर, रेखा इंगळे, ज्योती वालझाडे, राजेंद्र मोजाड, कैलास दळवी, शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement