दिव्य मराठी विशेष: ‘हर हर शिव शंभो’ साडेसात लाख भाविकांनी घेतले पाच ज्योतिर्लिंगांचे दर्शन; राज्यातील सर्वच धार्मिक स्थळांवर भाविकांच्या रांगा

दिव्य मराठी विशेष: ‘हर हर शिव शंभो’ साडेसात लाख भाविकांनी घेतले पाच ज्योतिर्लिंगांचे दर्शन; राज्यातील सर्वच धार्मिक स्थळांवर भाविकांच्या रांगा


प्रतिनिधी । छत्रपती संभाजीनगर20 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

प्रभू वैद्यनाथ : परळीमध्ये ५० हजार भाविक लीन

Advertisement

पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे सायंकाळी सात वाजेपर्यंत ५० हजार भाविकांनी दर्शन घेतले. सोमवारी रात्री १२ वाजता वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने प्रभू वैद्यनाथास रुद्राभिषेक करण्यात आल्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या महिला व पुरुषांसाठी दोन स्वतंत्र धर्मदर्शन रांगा तर पासेसची एक अशा तीन रांगा लागल्या होत्या. राज्यभरातून येथे गर्दी झाली होती.

त्र्यंबकेश्वर : तीर्थस्नान आणि ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी गर्दी

Advertisement

अधिक श्रावण संपताच निज श्रावणातील पहिल्याच सोमवारनिमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची गर्दी उसळली होती. दिवसभर भाविकांचा ओघ सुरू होता. मध्यरात्रीपासून भाविक कुशावर्त तीर्थात स्नानास व ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करण्यासाठी जात होते. १ लाख भाविकांनी येथे दर्शन घेतल्याचा अंदाज आहे.

घृष्णेश्वर : हर हर महादेवच्या गजराने वेरूळ गजबजले

Advertisement

श्रावणाच्या पहिल्या सोमवारी सव्वा लाखाहून अधिक भाविकांनी वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेव ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन महादेवास बेलफूल वाहिले. या वेळी लाखो भाविक राज्यासह परराज्यातून भोळ्या शंकराच्या दर्शनासाठी वेरूळ येथे मध्यरात्रीपासूनच दाखल झाले होते.

भीमाशंकर : २ लाख जणांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन

Advertisement

श्रीक्षेत्र भीमाशंकर हे ६ वे ज्योतिर्लिंग आहे. पहिल्याच श्रावणी सोमवारी शिवलिंगाची पहाटे ४.३० ला महापूजा व आरती झाल्यानंतर २ लाख भाविकांनी दर्शन घेतले आहे. हर हर महादेवच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. आज नागपंचमीनिमित्त मंदिर व गाभाऱ्यामध्ये फुलांची सजावट करण्यात आली होती.

औंढा नागनाथ : अडीच लाख भाविकांनी घेतले दर्शन

Advertisement

देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी (२१ ऑगस्ट) रात्री उशिरापर्यंत सुमारे दोन ते अडीच लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतल्याचा अंदाज संस्थानने व्यक्त केला आहे. पहिला श्रावणी सोमवार व नागपंचमी यामुळे भाविकांची गर्दी झाली होती.Source link

Advertisement