दिव्य मराठी विशेष: राज्यात बंदी असलेल्या एचटीबीटीचा 21.25 मे. टन साठा जप्त, याही हंगामात सुरू राहाणार कृषी विभागाची धडक कारवाई


नागपूर23 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात प्रतिबंधित एचटीबीटी बियाणांच्या लागवडीची परवानगी मिळवण्यासाठी शेतकरी संघटनेने आंदोलन छेडले होते. या संदर्भातले सर्व कायदे झुगारत देत हजारो शेतकरी या आंदेलनात सहभागी झाले होते. परिणामी दरवर्षी काही ठिकाणी प्रतीकात्मक एचटीबीटी बियाणांची पेरणी केली जाते.

Advertisement

मात्र कृषी विभागातर्फे एचटीबीटीवर कडक कारवाई करीत बियाणे जप्तीची कारवाई केली जाते. 2021-22 मध्ये 19.16 मे. टन तर 2022-23 मध्ये 2.09 मे. टन साठा जप्त करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाचे सांख्यिकी अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली.

माझे वावर-माझी पॉवर’ अशी घोषणा देत शेतकरी संघटनेने हे आंदोलन सुरू केले होते. एचटीबीटी बियाण्यांना मान्यता नसल्याने या बियाण्यांची लागवड करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून दरवर्षी केले जाते. त्यानंतरही ते चोरट्या मार्गाने मोठया प्रमाणात उपलब्ध आहे. शेतकरीही त्याची लागवड करीत आहेत. ते तणरोधक असल्याने फवारणी केल्यानंतर तण काढण्याचा खर्च कमी होतो.

Advertisement

शासन मान्यता नसल्यामुळे शेतकरी चोरट्या मार्गाने त्याची लागवड करतात किंवा लागवड केल्यानंतर सांगत नाहीत. भारतीय शेतकऱ्यांना जागतिक बाजारापेठेशी स्पर्धा करावी लागते हे त्यामागचे कारण असल्याचे सांगितले जाते. बेकायदेशीर एचबीटी लावल्या प्रकरणी 2021-22 मध्ये 24 तर 2022-23 मध्ये 17 पोलिस केसेस दाखल करण्यात आल्या. या शिवाय 2021-22 मध्ये 230 लाख तर 2022-23 मध्ये 42.29 लाख रूपयांचा साठा जप्त करण्यात आला.

या शिवाय बोगस तसेच जादा भावाने बियाणे विक्री करणे, इतर खते वा बीयाणे घेण्याची सक्ती करणे आदीवरही कारवाई केली जाते. 2020-21 मध्ये 163 बियाणे विक्रेत्यांचे, 1063 खत विक्रेते व 46 किटकनाशक विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. तर 40 बियाणे विक्रेत्यांचे, 179 खत विक्रेते व 32 किटकनाशक विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले. 136 बियाणे विक्रेत्यांवर, 33 खत विक्रेते व 12 किटकनाशक विक्रेत्यां विरुद्ध पोलिस तक्रार करण्यात आली.

Advertisement

याच प्रमाणे 2021-22 मध्ये 152 बियाणे विक्रेत्यांचे, 300 खत विक्रेते व 37 किटकनाशक विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. तर 13 बियाणे विक्रेत्यांचे, 10 खत विक्रेते व 01 किटकनाशक विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले. 31 बियाणे विक्रेत्यांवर, 10 खत विक्रेते व 08 किटकनाशक विक्रेत्यां विरुद्ध पोलिस तक्रार करण्यात आली. तर 2022-23 मध्ये 112 बियाणे विक्रेत्यांचे, 522 खत विक्रेते व 121 किटकनाशक विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. तर 31 बियाणे विक्रेत्यांचे, 46 खत विक्रेते व 12 किटकनाशक विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले.



Source link

Advertisement