दिव्य मराठी विशेष: पाणी-खताचे व्यवस्थापन करून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने घेतले एकरी तब्बल 117 टन ऊस उत्पादन


Advertisement

बेंबळे / सज्जन शिंदे2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

साधारणपणे उसाचा विचार करता एकरी ७० टनापर्यंत उत्पादन मिळते. मात्र, बेंबळे (ता. माढा) येथील शेतकरी सोमनाथ भास्कर हुलगे यांनी पाच एकर दहा गुंठे क्षेत्रात ६१७ टन ऊस उत्पादन घेतले आहे. त्यांनी को ८६०३२ या वाणाच्या उसाचे एकरी सरासरी ११७ टन उच्चांकी उत्पादन घेण्याचा विक्रम केला आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जिद्दीने मेहनत, पाणी, खत, कीड व रोगाचे योग्य व्यवस्थापन यासह अत्याधुनिक पद्धतीने शेती केल्यास विक्रमी उत्पादन घेता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे.

Advertisement

हुलगे यांनी कृषिभूषण संजीव माने यांच्या मार्गदर्शनाखाली उसाचे कीड, रोग, सेंद्रिय व रासायनिक खतांचा योग्य वापर, संजीवकांची फवारणी आणि पाण्याचे आदर्श व्यवस्थापन करत ही किमया साधली आहे. त्यांनी शेतात एकरी ३ टन शेणखत, २ टन साखर कारखान्याची मळी विस्कटून पुन्हा नांगरणी करून सरी सोडल्या. त्यानंतर रान तापवण्यासाठी मोकळे सोडले. नत्र, स्फुरद, पालाश व विरघळणाऱ्या जिवाणूंचा वापर करून ऊस लागवड केली. त्यासाठी बेणे प्रक्रियेला अधिक महत्त्व दिले. को ८६०३२ या वाणालाच पसंती दिली. लागवडीसाठी ५ फुटांच्या सऱ्या सोडल्या. एक डोळा पद्धतीने उसाची लागवड केली. ५ बाय २ फूट अंतराने लागवड करून ठिबक सिंचन केले. गरजेनुसार पाटानेही पाणी दिले. ठिबक सिंचनाद्वारे जीवामृत देऊन जमिनीची सुपीकता वाढवण्यावरही भर दिला. त्यासह रासायनिक खतांची एकत्रित मात्राही दिली. तोडणीवेळी ५० ते ५५ कांड्यांचा ऊस होता.

जिवाणूंच्या वापरामुळे जमिनीचा कस टिकला
उसाचे उत्पादन घेताना पाणी, खत, कीड व रोग यांच्या व्यवस्थापनासह पाचटाचे सरीत आच्छादन केले. त्यामुळे तणनियंत्रण, पाण्याचे बाष्पीभवन कमी झाले. तसेच नत्र, स्फुरद व पालाश ही खते पिकांना उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणूंचा वापर केल्यामुळे जमिनीचा कस टिकला. परिणामी उत्पादनात वाढ झाली. – साेमनाथ हुलगे, शेतकरी, बेंबळे, ता. माढा.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here