दिव्य मराठी विशेष: पक्षी निरीक्षणाच्या छंदापोटी सलीम अलींचे 10 खंड घेण्यासाठी पीएफवर कर्ज काढले होते : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली


Advertisement

सोलापूर6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • सोलापुरात आयोजित पक्षिमित्र संमेलनात झाली प्रकट मुलाखत

लहानपणापासूनच पक्ष्यांना निरखत हाेताे. वन खात्यात सेवेला सुरुवात झाल्यानंतर जंगलात भटकंती वाढली. पक्षी निरीक्षण सुरू केले. ते नेमके कसे करावे याबाबत मार्गदर्शन नव्हते. सलीम अली यांचे १० खंड वाचणे आवश्यक हाेते. हे खड खरेदी करण्यासाठी मी भविष्य निर्वाह निधीवर कर्ज काढले होते, असे ज्येष्ठ साहित्यिक, अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी येथे सांगितले. येथे आयोजित पक्षिमित्र संमेलनात शनिवारी झालेल्या प्रकट मुलाखतीत डाॅ. व्यंकटेश मेतन यांनी विचारलेल्या प्रश्नांतून चितमपल्ली यांनी पक्षी निरीक्षणाचा प्रवास उलगडला.

Advertisement

…अन् पक्षीकोश तयार झाला : चितमपल्ली म्हणाले, सलीम अली मुंबईहून आले की कर्नाळाला थांबायचे. अलिबागच्या बंगल्यावर जायचे. पक्षीनिरीक्षणासाठी त्यांची ठिकाणे ठरलेली हाेती. तिथून येता-जाता हाका मारायचे. आम्ही भेटत, पक्षीनिरीक्षणावर बाेलत असू. ते म्हणायचे, पक्षीनिरीक्षणासाठी नाेंदी आवश्यक असतात. त्यासाठी नेहमी जवळ डायरी ठेवा. त्यानंतर मी इतक्या डायऱ्या लिहिल्या की, त्यातूनच ‘पक्षीकाेश’ तयार झाला. नवाेदितांना मी हेच नेहमी सांगताे की, पक्षीनिरीक्षण म्हणजे केवळ पाहणे नाही. नाेंदीसाठी डायरी लिहीत जा.

आताच्या पिढीबाबत बोलायचे झाले तर, माेबाइलवर फाेटाे काढले की झाले पक्षीनिरीक्षण. पाणवठ्यावरचे, माळरानातले पक्षी कसे असतात, त्यांचा रंग कसा असताे, त्यांच्या शेवटाची हालचाल कशी असते, या सर्व बाबी नाेंदवायच्या असतात. नागपुरात प्रत्येक १० किलाेमीटर अंतरावर जंगल लागते. देशात असे शहर कुठेच नाही. त्यामुळे तिथे पक्षांचा अधिक वावर झाल्याचेही मारुती चितमपल्ली यांनी नमूद केले आहे.

Advertisement

त्यामुळे वयाच्या ४० व्या वर्षी संस्कृत शिकण्यासाठी असा प्रवेश मिळवला
मी जंगलातच ४० वर्षे हाेताे. आपले वंशजही जंगलातच हाेते. त्यांनी वेद-उपनिषदे लिहिली. ती संस्कृतमध्ये असल्याने वाचता आली नव्हती. त्यामुळे वयाच्या ४० व्या वर्षी संस्कृत शिकण्यासाठी नांदेड येथे गेलाे. शिकवणाऱ्यांनी विचारले, ‘काय करता?’ मी म्हटले, ‘फाॅरेस्ट आॅफिसर…’ त्यांनी लगेच म्हटले, ‘नाही, तुम्हाला प्रवेश मिळणार नाही.’ प्रा. नरहर कुरुंदकर यांना ही बाब सांगितली. ते थाेडे रागावून म्हणाले, ‘एकटा का गेला?’ तिथून त्यांनी मला संस्कृत शिक्षकाकडे नेले. त्यांनी शिक्षकांना सांगितले की, ‘हा फाॅरेस्ट आॅफिसर असला तरी चांगला आहे. शिकवा.’ त्यानंतर प्रवेश मिळाला. नंतर ऋग्वेद, यजुर्वेद वाचता आले, असेही चितमपल्ली म्हणाले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement