दिव्य मराठी विशेष: नवजात बालकांसाठी मानवी दूध बँक सुरू,  अभिनेत्री मृणाल कुलकर्णीच्या हस्ते झाले उद्घाटन


औरंगाबाद19 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

जागतिक पातळीवर मुदतपूर्व जन्मणाऱ्या पंधरा लाख बालकांपैकी एक पंचमाश बालके भारतात जन्मतात. मुदतपूर्व जन्मल्याने पाच वर्षाखालील बालकांचा देशात सर्वाधिक मृत्यू होण्याचे प्रमुख कारण मानले जाते. त्यामुळेच अपुऱ्या दिवसांच्या नवजात अर्भकांना मातेचे दूध मिळावे, यासाठी सूर्या हॉस्पिटलने ‘ह्युमन मिल्क बँक’ सुरू केली आहे.

Advertisement

प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते या सुविधेचे रविवारी उदघाटन करण्यात आले. त्यामुळे मुदतपूर्व बालकांना मातेचे दूध मिळू शकेल आणि त्यांना विविध आजारातून लवकर बरे होण्याचा मार्ग मोकळा होईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, स्तनपान केल्याने दरवर्षी आठ लाखांपेक्षा जास्त बालकांचे प्राण वाचू शकतात. बहुतेक सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांना यामुळे जीवदान मिळू शकेल. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, ‘ बहुतेक आजारी नवजात शिशू आणि अकाली बाळांना आयुष्याच्या पहिल्या आठवड्यात आईचे दूध मिळत नसल्याने मानवी दूध बँका त्यांच्यासाठी वरदान ठरत आहेत.

सातशे नवजात बालकांना सेवा : डॉ. सचिन शहा म्हणाले,’ आमचे नवजात अर्भक युनिट दरवर्षी सुमारे सातशे नवजात बाळांना सेवा पुरवते. मुदतपूर्व बालकांना मातेचे स्तनपानच उपयुक्त ठरते. प्रत्येक नवजात बालकांचे अतिदक्षता विभाग मानवी दूध बँकेच्या माध्यमातून सुसज्ज असला पाहिजे, असा आम्हाला विश्वास वाटतो.’ हॉस्पिटलच्या लॅक्टेशन कन्सल्टंट डॉ. मनीषा खलाणे म्हणाल्या, ‘नर्सिंग मॉम्सने त्यांचे दूध द्यावे अशी आमची इच्छा आहे. कमी वजन असलेल्या सर्व अकाली बाळांना स्तनांच्या दुधाचा पुरवठा करणे आवश्यक आहे. बाळांना त्याचा मोठा फायदा होतो.

Advertisement

दुधाला केले जाते पाश्चराइझ; डीप फ्रीझरमध्ये ते साठवतात
स्वत: च्या बाळांच्या दुधाच्या गरजा पूर्ण केल्यावर आणि मूलभूत वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अतिरिक्त प्रमाणात उत्पादित झालेले दूध दात्या मातांकडून सूर्या हॉस्पिटलच्या ह्युमन मिल्क बँकेला मिळते. त्यानंतर दान केलेले दूध विशेष कंटेनरमध्ये ठेवले जाते. त्यानंतर हे दूध पाश्चराइझ केले जाते. त्या दुधाच्या पिण्याने अन्य बालकाना संसर्ग होणार नाही, ना याची खातरजमा केली जाते. डीप फ्रीझरमध्ये ते साठवतात. जेव्हा गरज भासते, तेव्हा गोठवलेले दूध वितळवले जाते आणि ते नवजात बालकास दिले जाते.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement