दिव्य मराठी विशेष: द्वेषाची रोगराई पाहता भाषा सुधारण्यासाठी सर्वच राजकारण्यांना होमिओपॅथी गोळ्या द्याव्यात – अॅड. उज्ज्वल निकम यांचा सल्ला


Advertisement

पुणे31 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • डॉ. अमरसिंह निकम लिखित “अ होमिओपॅथ्स गाइड टू कोविड-19’ पुस्तकाचे प्रकाशन

अॅलोपॅथी-होमिओपॅथी हा वाद, त्यातील मतमतांतरे जुना विषय आहे. पण होमिओपॅथीने अनेक चमत्कार घडवल्याचे पहिले आहे. ही पॅथी अनेक आजारांवर गुणकारी आहे. अॅलोपॅथीमध्ये अनेकदा औषधांचे विपरीत परिणाम होतात. होमिओपॅथी त्याला अपवाद आहे. कोणत्याही ऑपरेशन किंवा इंजेक्शनशिवाय केवळ पांढऱ्या गोळ्या प्रभावी ठरतात. त्यामुळे होमिओपॅथीला सर्वमान्यता मिळण्याची आवश्यकता आहे. भाषा सुधारासाठी राजकारण्यांना होमिओपॅथीच्या गोळ्या द्याव्यात, असा टोला विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी लगावला.

Advertisement

मिशन होमिओपॅथी व आदित्य होमिओपॅथिक हॉस्पिटल अँड हिलिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. अमरसिंह निकम लिखित ‘अ होमिओपॅथ्स गाइड टू कोविड-१९’ या पुस्तकाचा प्रकाशन व ‘होमिओपॅथिक कोविड हीरो’ सन्मान सोहळ्यात अॅड. निकम बोलत होते. रावेत येथे झालेल्या या सोहळ्यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रसाद लाड, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह प्रवीण दबडगाव, होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ. अमरसिंह निकम, डॉ. जसवंत पाटील, अजय कौल, अॅड. आसावरी जगदाळे, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे सदस्य डॉ. बाळकृष्ण गायकवाड आदी उपस्थित होते.

अॅड. निकम म्हणाले, होमिओपॅथी शारीरिक-मानसिक आजारांवर प्रभावी ठरते. महाराष्ट्राचे राजकारण तसेच सध्याची राजकीय भाषा पाहता द्वेषाचा रोग लागल्याचे दिसते. त्यावर उपचारासाठी होमिओपॅथीने पुढाकार घ्यायला हरकत नाही. होमिओपॅथीतज्ज्ञांनी अशा परिणामकारक गोळ्या राजकारण्यांसाठीही तयार कराव्यात, जेणेकरून त्यांच्या तोंडून शिवराळ भाषा येणार नाही आणि श्रोत्यांना ऐकायला आनंद वाटेल. माझ्या जिल्ह्यातील राजकीय लोकांना हे स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न करत असतो, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी या वेळी बोलताना केली.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here