सोलापूर4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
बार्शी शहर आणि तालुका पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक, फौजदार आणि दोन हवालदार यांना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी निलंबित केले आहे. पोलिस अधीक्षक यांनी याबाबत अहवाल सादर केला होता. बार्शी तालुक्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महारुद्र परजणे, हवालदार राजेंद्र मंगरूळे, बार्शी शहरचे फौजदार सारिका गटकुल, हवालदार अरुण माळी यांना निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे, अशी माहिती सोलापूर पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
बार्शी | अल्पवयीन मुलीवरील दुष्कर्म व पोक्सो अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपी अक्षय विनायक माने व नामदेव सिध्देश्वर दळवी ( दोघे रा. बळेवाडी, ता. बार्शी) याना बार्शी शहर पोलिसांनी अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दोघांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अल्पवयीन पीडितेवर बळजबरीने दुष्कर्म केल्याप्रकरणी सदरच्या दोघांवर बार्शी शहर पोलीसांत दुष्कर्म आणि पोक्सो अन्वये ५ मार्च रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर दोघांनी पिडीतेवर हल्ला केला होता.