दिव्य मराठी विशेष: औरंगाबाद शहरातील पहिले जिजाऊ स्मारक नारायणनगरात; राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त उत्सव सोहळ्याचे आयोजन


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Rajmata Jijau Jayanti | Aurangabad | Marathi News | The First Jijau Monument In Aurangabad City At Narayanagar; Organizing A Celebration On The Occasion Of Rajmata Jijau Jayanti

Advertisement

संतोष देशमुख | औरंगाबाद3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

सातारा परिसरातील नारायणनगरातील नागरिकांनी लोकसहभागातून जिजाऊ उद्यानाची निर्मिती करून राजमाता जिजाऊंचे शहरातील पहिले स्मारक उभारले आहे. १२ जानेवारी रोजी जिजाऊ जयंतीनिमित्त उत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाचे नियम पाळून दर्शन घ्यावे, असे आवाहन जिजामाता उद्यान समितीतर्फे करण्यात आले आहे.

Advertisement

नारायणनगरातील नागरिकांनी पडीक जागा स्वच्छ सुंदर केली. चहुबाजूने वृक्ष लावून जिजाऊ उद्यान तयार केले. मुलांना खेळण्यासाठी व नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था केली. लोकसहभागातून या उद्यानात राजमाता जिजाऊ स्मारक उभारले. १२ जानेवारी रोजी जिजाऊंच्या जयंतीनिमित्त जिजाऊ उद्यान समितीतर्फे जिजाऊ सोहळा होणार आहे. जिल्हा प्रशासनाने ५० जणांची मर्यादा दिली आहे. सर्व नियमांचे पालन करून हा सोहळा साजरा केला जाणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

घरीच साजरा करा उत्सव : नंदनवन कॉलनीत जिजाऊ उद्यान आहे. पण उद्यानात जिजाऊंचे स्मारक नाही. म्हाडा कॉलनीत जिजाऊ मंदिर आहे. पण नारायणनगरात जिजाऊ उद्यान व उद्यानातील पहिले स्मारक साकारले आहे. कोरोनामुळे घरच्या घरी जिजाऊ उत्सव साजरा करावा, असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले आहे.

Advertisement

पडीक जागा बनली नंदनवन
उद्यानाला चारही बाजूने तार कंपाउंड केले आहे. वृक्षारोपण करून फुलझाडे लावली आहेत. पक्ष्यांसाठी दाणापाण्याची व्यवस्था केली आहे. दर्शनासाठी आलेल्यांना जिजामाता उद्यान गेटवरूनच प्रवेश दिला जातो. महाराष्ट्रातील अठरापगड समाजाची अस्मिता असलेल्या राजमाता जिजाऊंचे पर्यटनस्थळ साकारले आहे. लोकसहभागातून ही जागा सर्वांसाठी व पक्ष्यांसाठी नंदनवन बनली आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement