दिव्य मराठी विशेष: उत्तर चीनमध्ये पाणीटंचाईचे भीषण चित्र; लोकसंख्या वाढ, नापिकी वाढल्याने आशियात चिंता


  • Marathi News
  • National
  • Severe Water Scarcity In China 20% Of The World’s Population And Only 7% Of The Water

Advertisement

एका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या चीनमध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. चीनच्या उत्तरेकडील पाण्याचे संकट धोकादायक स्थितीपर्यंत जाऊन पोहोचले आहे. काही भागातील स्थिती अरब देशांहून जास्त भीषण असल्याचे दिसून येते. चीनवरील हे पाणी संकट आशियातील इतर देशांच्या दृष्टीनेही गंभीर ठरू शकते. तज्ज्ञ गोपाल रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी २० टक्के लोक चीनमध्ये राहतात. परंतु त्या तुलनेत चीनकडे ७ टक्के पाण्याची उपलब्धता आहे. उत्तर चीनमधील दुष्काळी चित्र मध्य-पूर्वेपेक्षाही दयनीय आहे. चीनच्या हजारो नद्या नामशेष झाल्या आहेत. उर्वरित पाणी आैद्योगिकीकरण व प्रदूषणामुळे दूषित बनले आहे. चीनमधील ८० ते ९० टक्के भूजल पिण्यायोग्य नसल्याचा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. त्यावरून चीनमधील दूषित पाण्याची आणि टंचाईची भीषणता लक्षात येते.

Advertisement

एक चतुर्थांश नदीचे पाणीदेखील प्रदूषित आहे. त्याचा उपयोग उद्योग किंवा शेतीसाठीही करता येऊ शकत नाही. चीनमधील ही सर्वात जटिल समस्या मानली जाते. आता चीनला इतर नद्यांचे पाणी उत्तरेच्या भागात वळवावे लागेल. कारण उत्तरेकडील भाग दुष्काळाची झळा सोसू लागला आहे. पाण्याच्या तुटवड्यामुळे चीनला वार्षिक उत्पन्नापैकी १०० अब्ज डॉलर (सुमारे ७.४३ कोटी रुपये) एवढी हानी सोसावी लागते. सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने शेतजमिनीचे रूपांतर वाळवंटात होऊ लागले आहे. देशभरात पाण्याची टंचाई भासू लागली आहे.सरकारने पाण्याचे रेशनिंग करून त्याच्या व्यवस्थापनात सुधारणेचे प्रयत्न केले. परंतु सरकारी पातळीवरील हे प्रयत्न तोकड ठरतात. ग्वांग्झू व शेनझेन प्रांतांना पुढल्या वर्षी दुष्काळाला तोंड द्यावे लागणार आहे.

हिमालयात तणाव वाढण्याची शक्यता
ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह भारतात प्रवेश करण्यापूर्वीच त्यावर धरण बांधण्याची चीनची योजना आहे. त्यामुळे भारत व बांगलादेशचे नुकसान होणार आहे. दक्षिण चीन सागर व हिमालयात चीनने आक्रमक धोरण ठेवत विस्तारवादाचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. सागरी संसाधनांचा वापर आपल्या बाजूने अनुकूल करण्याचे चीन लपूनछपून प्रयत्न करतो, असे भारतीय रणनीतीचे विश्लेषक ब्रह्म चेलानी यांनी सांगितले.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement