दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट: ओमायक्रॉनची धास्ती; लसीसाठी पुन्हा रांगा, नगर शहरात 24 तासात 14 रुग्ण


Advertisement

अहमदनगरएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक
  • लसोत्सव पहिल्याच दिवशी 15 ते 18 वयोगटातील 1103 मुलांना लस, नगर शहरात 24 तासात 14 रुग्ण

नगर शहरात मागील काही महिन्यांपासून लसीकरणाची मोहीम, नागरिकांचा प्रतिसाद कमी असल्याने रोडावली होती. ओमायक्रॉनचे दोन रुग्ण नगर जिल्ह्यात आढळल्यानंतर मात्र, नागरिकांनी लसीकरणासाठी पुन्हा एकदा रांगा लावल्याचे चित्र आहे. सोमवारपासून शहरात १५ वर्षावरील मुलांनाही लसीकरण देण्यास सुरूवात करण्यात आली. दिवसभरात १५ ते १८ वयोगटातील १ हजार १०३ मुलांचे लसीकरण झाले आहे. शहरातील एकूण लसीकरणाचा आकडा ४ लाख २१ हजार ३१८ वर पोहोचला आहे.

Advertisement

कोरोनाची पहिली लाट डिसेंबर २०२० अखेर ओसरल्याचे चित्र दिसले. परंतु, रुग्णवाढीचा आकडा शुन्यावर पोहोचला नाही. जानेवारी २०२१ नंतर पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरू झाला. त्याचबरोबर कोविशिल्ड व नंतर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध झाल्यामुळे मनपाने विविध आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करून दिली. सुरुवातीला मागणीच्या तुलनेत लसचा अत्यल्प पुरवठा होत असल्याने अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता. परंतु, पुन्हा एकदा मुबलक लस उपलब्ध झाल्यानंतर केंद्रावरील गर्दी ओसरली.

मास्क अन् सॅनिटायझरचा वापर करा, गर्दी करू नये

Advertisement

मागील काही महिन्यांत शहराचा रुग्णवाढीचा दर दहाच्या आतमध्ये होता, परंतु, सोमवारी १४ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. रुग्णवाढीचा दर वाढता राहिला, तर आम्हाला कन्टेन्मेंट झोन तसेच कारवाईसारखे कठोर निर्णय घ्यावे लागतील. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याबरोबरच गर्दी करू नये. १५ वर्षावरील मुलांसाठी मनपाच्या आठ केंद्रांत लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे.” शंकर गोरे, आयुक्त, मनपा.

कोरोनाची पहिली लाट डिसेंबर २०२० अखेर ओसरल्याचे चित्र दिसले. परंतु, रुग्णवाढीचा आकडा शुन्यावर पोहोचला नाही. जानेवारी २०२१ नंतर पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरू झाला. त्याचबरोबर कोविशिल्ड व नंतर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध झाल्यामुळे मनपाने विविध आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करून दिली. सुरुवातीला मागणीच्या तुलनेत लसचा अत्यल्प पुरवठा होत असल्याने अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता. परंतु, पुन्हा एकदा मुबलक लस उपलब्ध झाल्यानंतर केंद्रावरील गर्दी ओसरली.

Advertisement

नगर शहरात १८ वर्षांवरील सुमारे २ लाख ८१ हजार नागरिक आहेत. या सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी मनपास्तरावर विविध मोहिमा राबवण्यात आल्या. नगर शहरात आतापर्यंत शहरातील २ लाख ४६ हजार नागरिकांनी पहिला डोस तर १ लाख ७५ हजार ६२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यातच महिनाभरापूर्वी नगर जिल्ह्यात ओमायक्राॅन व्हेरिएंटचा शिरकाव झाल्यामुळे पुन्हा एकदा लसीकरण मोहिमेला गती मिळाली आहे.

सोमवारपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांनाही लसीकरण सुरू करण्यात आले. दिव्य मराठीने मनपाच्या सावेडी केंद्रांची पाहणी केली असता, केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यात १८ वर्षावरील नागरिकांबरोबरच १५ वर्षावरील मुलांचाही समावेश होता. एका केंद्रावर दररोज २०० ते ३०० नागरिकांना लस दिली जात आहे. महापाैर रोहिणी शेंडगे, आयुक्त शंकर गोरे, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, प्रसिद्धी विभागाचे प्रमुख शशिकांत नजान यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली.

Advertisement

१९ हजार मुलांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट
नगर शहरात १५ ते १८ वयोगटातील सुमारे १९ हजार मुले आहेत, या मुलांच्या लसीकरणाला सोमवारपासून सुरूवात झाली. मनपाच्या आठ आरोग्य केंद्रांबरोबरच मंगळवारपासून काही शाळा व महाविद्यालयांमध्येही लसीकरणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.

नगर शहरात लसीकरणासाठी केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. सोमवारपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला महापौर रोहिणी शेंडगे आयुक्त शंकर गोरे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. मंगळवारपासून शाळा व महाविद्यालयांमध्येही लसीकरणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Advertisement

शहरातील लसीकरणाचा आकडा ४.२१ लाखांवर, एका केंद्रावर दररोज २०० नागरिकांना लस

नगर शहरात मागील काही महिन्यांपासून दररोज पाच ते दहा नवीन कोरोनाचे रूग्ण आढळून येत होते. परंतु, सोमवारी (३ जानेवारी) आकडा १४ पर्यंत पोहोचल्याने, कोरोना रुग्णवाढीची धास्ती वाढली आहे. शहरात सद्यस्थितीत ७१ सक्रीय रुग्ण आहेत, तर २८ रुग्ण होमक्वारंटाइन आहेत.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement