मुंबई2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
मुंबईतील कुर्ला येथे सोमवारी एक चाळ कोसळली. या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाला. ही घटना रात्री 8.30 वाजता घडली. बीएमसीच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
आजची दुसरी मोठी बातमी…
मुंबई-रांची इंडिगो विमानातील प्रवाशाची प्रकृती खालावली, नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग, रुग्णालयात मृत्यू
मुंबईहून रांचीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे सोमवारी सायंकाळी नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका प्रवाशाला अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
प्रवाशाला नागपुरातच दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत. 62 वर्षीय देवानंद तिवारी असे या प्रवाशाचे नाव आहे. वाचा संपूर्ण बातमी
रामलिंग धुळोबा मंदिराकडे दर्शनासाठी जाताना अपघातात 3 भाविकांचा मृत्यू; एसटी बसची रिक्षाला धडक
प्रवित्र श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी रामलिंग धुळोबा मंदिराकडे दर्शनासाठी जाताना अपघातात तिन भाविकांचा मृत्यू झाला आहे. हे भाविक रिक्षाने दर्शनासाठी निघाले होते. त्यांच्या रिक्षाला भरधाव एसटी बसची जोरदार धडक लागली. त्यात रिक्षांतील तिघे ठार झाले. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.