नागपूर22 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याने प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी परिवहन आयुक्तांनी महिला तक्रार निवारण समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात संबंधित तक्रारदार महिलेला रवींद्र भुयार यांच्या विरुद्ध मानहानी कारक बातम्या सोशल मीडिया वर पसरवण्यास दिवाणी न्यायालयाने मनाई हुकूम दिला आहे.
तक्रारदार महिला अधिकाऱ्याने रवींद्र भुयार यांच्या विरुद्ध लैंगिक शोषण व विनयभंगाची तक्रार परिवहन आयुक्तांकडे केली होती. परंतु, त्या तक्रार अर्जाची प्रत महिला अधिकाऱ्याने व्हॉट्सॲप ग्रुप व सोशल मीडियावर भुयार यांची बदनामी होईल या उद्देशाने व्हायरल केली. व्हायरल केलेले पत्र प्रशासकीय व्यवहाराची गुप्तता न बाळगता भुयार यांची बदनामी होईल या उद्देशाने व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियाद्वारे पसरवले.
भुयार यांची बदनामी
ही कृती बदनामीकारक असून शासकीय अधिकाऱ्यांची व विभागाची बदनामी होईल या हेतूने केले आहे. व्हायरल केलेले पत्र गंभीर तक्रारीशी निगडित असून त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाचे परिवहन अधिकारी भुयार यांची बदनामी झाली.
दिवाणी दावा दाखल
यामुळे रवींद्र भुयार यांनी दिवाणी न्यायालयात तक्रारदार महिला अधिकारी यांच्या विरुद्ध दिवाणी दावा दाखल केला. न्यायालयाने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तक्रारदार महिला अधिकाऱ्याला सोशल मीडिया किंवा अजून कुठल्याही प्रसार माध्यमाद्वारे रवींद्र भुयार यांच्या विरुद्ध कुठलाही बदनामीकारक बातम्या प्रकाशित करण्या करीता मनाई हुकूम दिलेला आहे. रवींद्र भुयार यांच्यातर्फे ॲड. चंद्रकांत रोहनकर आणि आणि ॲड. संकेत वालदे यांनी बाजू मांडली.