दिल्ली कॅपिटल संघाने अखेरच्या षटकापर्यंत झुंजली पण अखेर ६ धावांनी त्यांचा पराभव

दिल्ली कॅपिटल संघाने अखेरच्या षटकापर्यंत झुंजली पण अखेर ६ धावांनी त्यांचा पराभव
दिल्ली कॅपिटल संघाने अखेरच्या षटकापर्यंत झुंजली पण अखेर ६ धावांनी त्यांचा पराभव

लखनौ सुपर जायंटने शेवटच्या सामन्यापर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा ६ धावांनी पराभव केला. लखनौने २० षटकात ३ बाद १९५ धावा ठोकल्या होत्या. मात्र दिल्लीने २० षटकात ७ बाद १८९ धावा केल्या. लखनौकडून केएल राहुलने सर्वाधिक ७७ धावा केल्या. तर दिल्लीकडून शार्दुल ठाकूरने ३ विकेट घेतल्या. या धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीच्या फलंदाजीला मोहसीन खानने भेदक मारा करत सुरूंग लावला. त्याने ४ विकेट घेतल्या. दिल्लीकडून अक्षर पटेलने २४ चेंडूत ४२ धावा करत एकाकी झुंज दिली.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना कमालीचा चुरशीचा झाला. १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचे दोन्ही सलामीवीर १३ धावांवर माघारी परतले. त्यानंतर मिचेल मार्श व रिषभ पंत यांनी धु धु धुतले… मार्शच्या दुर्दैवी विकेटनंतर फॉर्मात असलेला ललित यावदही बाद झाला. कर्णधार रिषभ पंत व रोव्हमन पॉवेल ही जोडी चांगली जमली होती, परंतु मोहसिन खानने भन्नाट चेंडू टाकून रिषभचा त्रिफळा उडवला अन् त्यानंतर दणादण दोन धक्के दिले. आयपीएल २०१८पासून मुंबई इंडियन्ससोबत असणाऱ्या मोहसिनला लखनौ सुपर जायंट्सने संधी दिली आणि त्याचं त्यानं सोनं केलं. चार विकेट्स घेत त्याने लखनौला विजय मिळवून दिला.

दुश्मंथा चमिराने दुसऱ्याच षटकात दिल्लीला धक्का दिला. पृथ्वी (५) झेलबाद झाला. डेव्हिड वॉर्नरही ३ धावांवर बाद झाला. मिचेल मार्श व रिषभ पंत यांनी २५ चेंडूंत ६० धावा जोडल्या. मार्शला मग गौथमने बाद केले. तो २० चेंडूंत तो ३ चौकार व ३ षटकारांसह ३७ धावांवर माघारी परतला. पण, अल्ट्राएजमध्ये बॅट व चेंडूचा संपर्कच झाला नसल्याचे दिसले.रवी बिश्नोईने त्यानंतर फॉर्मात असलेल्या ललित यादवला (३) त्रिफळाचीत केले. रिषभ व रोव्हमन पॉवेल हे चांगले फटके मारत होते. पॉवेलने तर १२व्या षटकात गौथमच्या गोलंदाजीवर ६,६,४ असे दणदणीत फटके मारले. १३व्या षटकात मोहसिन खानने भारी चेंडू टाकला. फटकेबाजीच्या प्रयत्नात असलेल्या रिषभची बॅट अन् पॅड याच्या मधून तो चेंडू ज्या वेगाने यष्टिंवर आदळला, त्याच्या आवाजाने स्टेडियवर सन्नाटा पसरला.

Advertisement

रिषभ ३० चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ४४ धावांवर बाद झाला. त्यानंतर १६व्या षटकात मोहसिनने दोन धक्के दिले. पॉवेल ( ३५) व शार्दूल ठाकूर ( १) हे माघारी परतल्याने दिल्लीचा पराभव निश्चित झाला. मोहसिनने ४ षटकांत १६ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलने दमदार खेळ करताना ६ चेंडूंत २ धावा असा सामना आणला. कुलदीप यादवने २०व्या षटकातील मार्कस स्टॉयनिसने टाकलेला पहिलाच चेंडू षटकार खेचला. त्यानंतर Wide, १, ०, ० असे चेंडू पडल्यानं २ चेंडूंत १३ धावा दिल्लीच्या बनवायच्या होत्या. पाचवा चेंडूही निर्धाव राहिला अन् लखनौने सामना जिंकला. अक्षरने अखेरचा चेंडू ६ मारला, परंतु लखनौने ६ धावांनी हा सामना जिंकला. अक्षर २४ चेंडूंत ४२ धावांवर नाबाद राहिला, कुलदीपनेही ८ चेंडूंत १६ धावा केल्या. दिल्लीला ७ बाद १८९ धावा करता आल्या.

Advertisement