दिल्ली कॅपिटल्सच्या आजच्या विजयाने प्ले-ऑफची रंगत आणखी वाढली  

दिल्ली कॅपिटल्सच्या आजच्या विजयाने प्ले-ऑफची रंगत आणखी वाढली
दिल्ली कॅपिटल्सच्या आजच्या विजयाने प्ले-ऑफची रंगत आणखी वाढली

दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सने ठेवलेले १४७ धावांचे आव्हान ६ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. दिल्लीकडून रोव्हमन पॉवेलने आक्रमक ३३ धावांची खेळी केली. याचबरोबर डेव्हिड वॉर्नरने देखील ४२ धावांची खेळी केली. केकेआरकडून उमेश यादवने ३ विकेट घेत दिल्लीला टेन्शन दिले होते. मात्र अखेर दिल्लीने १४७ धावांचे आव्हान १९ व्या षटकात पार केले. अक्षर पटेल बाद झाल्यानंतर पॉवेलने धडाकेबाज फलंदाजी करत दिल्लीला सामना १९ व्या षटकातच जिंकून दिला. त्याने १६ चेंडूत ३३ धावा ठोकल्या. कुलदीप यादवने चार विकेट्स काढत सामनावीराचा पुरस्कार पटकावला.

दिल्लीचा निम्मा संघ शंभरच्या आतच माघारी गेल्यानंतर अक्षर पटेलने १७ चेंडूत २४ धावा करत दिल्लीला आधार दिला होता. मात्र त्याला श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यरने धावबाद केले. उमेश यादवने दिल्लीला चांगलेच हादरे दिले. त्याने दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला अवघ्या दोन धावांवर बाद करत आपली तिसरी शिकार केली. यामुळे दिल्लीची अवस्था ३ बाद ८२ धावांवरून ५ बाद ८४ धावा अशी झाली होती. सुनील नारायणने दिल्लीचा सेट झालेला फलंदाज ललित यादवला २२ धावांवर बाद करत दिल्लीला चौथा धक्का दिला. खराब सुरूवातीनंतर दिल्लीच्या डेव्हिड वॉर्नर आणि ललित यादव यांनी डाव सावरत तिसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी रचली. मात्र अखेर उमेश यादवने ४२ धावा करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला बाद करत ही जोडी फोडली. कोरोनामधून सावरत संघात परतलेल्या मिशेल मार्शने निराशा केली. त्याला हर्षीत राणाने १३ धावांवर बाद केले.

उमेश यादवने दिल्लीला पहिल्याच चेंडूवर धक्का दिला. त्याने सलामीवीर पृथ्वी शॉला डावाच्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद केले. मुस्तफिजूर रहीमने शेवटच्या षटकात केकेआरचे तीन फलंदाज बाद करत त्यांचे १५० च्या पुढे जाण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. त्याने दुसऱ्या चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर विकेट घेत केकेआरला १४६ धावांवर रोखले. केकेआरचे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना नितीश राणाने केकेआरचा डाव सावरला. त्याने अर्धशतकी खेळी करत संघाला १५० च्या जवळ पोहचवले. त्याने रिंकू सिंह याच्याबरोबर अर्धशतकी भागीदारी रचली. कुलदीपने १४ व्या षटकात पहिल्याच चेंडूवर श्रेयस अय्यरला बाद केले. त्यानंतर षटकाच्या चौथ्या चेंडूवर कुलदीपने केकेआरला मोठा धक्का दिला. त्याने आंद्रे रसेलला शुन्यावर बाद केले.

Advertisement

दिल्ली कॅपिटल्सने या सामन्यात नाणेफेक जिंकत कोलकाता नाईट रायडर्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी कोलकाताने ९ विकेट्स गमावत १४६ धावा चोपल्या. कोलकाताच्या १४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकडून सलामीला पृथ्वी शॉ आणि मिशेल मार्श आले होते. यावेळी शॉ पहिल्याच चेंडूवर गोल्डन डक (शून्यावर बाद) झाला. त्यानंतर फलंदाजीला डेविड वॉर्नर आला. वॉर्नरने येताक्षणीच चौकार लगावला. यानंतर त्याने पुढेही फटकेबाजी सुरूच ठेवली. वॉर्नरने या सामन्यात एकूण ४२ धावा केल्या. यामध्ये ८ चौकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याने डावाच्या सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर एक धाव घेत २४ धावा पूर्ण करताच एक खास कामगिरी केली. त्याने कोलकाताविरुद्ध आपल्या १००० धावांचा टप्पा पूर्ण केला. या विजयासह दिल्ली संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी पोहोचला आहे. तसेच, कोलकाता संघ आठव्या स्थानी कायम आहे.

Advertisement