दिल्लीविरुद्ध आश्विनची बॅट तळपली अन् सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, राजस्थानचा पंतलाही टोला
RR vs DC : नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (RR vs DC) या दोन संघात पार पडत आहे. दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी गोलंदाजीही चांगली केली असली तरी राजस्थानचा अष्टपैलू रवीचंद्रन आश्विनने एकहाती उत्तम झुंज देत अप्रतिम अर्धशतक लगावलं आहे. विशेष म्हणजे आयपीएलमधील त्याचं हे पहिलचं अर्धशतक ठरलं आहे. एकीकडे बटलर, संजू हे दिग्गज तंबूत परतले असले तरी आश्विनने दमदार फलंदाजी केली. दरम्यान राजस्थानने देखील आश्विनला थेट पहिला गडी बाद झाल्यावर फलंदाजीला पाठवत एक वेगळा डाव खेळला जो यशस्वी देखील झाला आहे. आश्विनने दमदार खेळी केली मात्र नेटकऱ्यांनी मात्र सोशल मीडियावर हटके मीम्स शेअर करत या खेळीला आणखी यादगार केलं आहे.

या मीम्सची सुरुवातच राजस्थान रॉयल्सने केली. राजस्थानच्या सोशल मीडिया टीमने सर्वात आधी दिल्लीचा कर्णधार पंतचा फोटो शेअर केला. ज्यावर कम ऑन एश असं लिहिलं होतं, कसोटी सामन्यांमध्ये आश्विन गोलंदाजी करताना पंत यष्टीरक्षण करताना आश्विनला चिअर करतो. पण आज पंतच्या संघाविरुद्ध खेळताना आश्विन फटकेबाजी करताना पंतला टोला देत हे मीम शेअर करण्यात आलं.

[tw]https://twitter.com/rajasthanroyals/status/1524396848219582465?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1524396848219582465%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fsports%2Fipl%2Frr-vs-dc-ashwin-hit-fours-and-sixes-rajasthan-had-fun-with-rishabh-pant-shared-this-special-picture-2121579[/tw]

आश्विनचं दमदार अर्धशतक

आश्विनने सामन्यात 37 चेंडूत लगावलेलं हे अर्धशतक त्याच्या कारकिर्दीतील पहिलं आयपीएल अर्धशतक आहे. सामन्यात त्याने 38 चेंडूत 50 धावा केल्या असून यावेळी त्याने सहा चौकार आणि दोन षटकार देखील लगावले. थेट वन डाऊन येत आश्विनने केलेल्या या खेळीचं कौतुक होत असून काही मीम्मही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावर एक नजर फिरवू…

[tw]https://twitter.com/RunningBtWicket/status/1524403156670500864?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1524403156670500864%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fsports%2Fipl%2Frr-vs-dc-ashwin-hit-fours-and-sixes-rajasthan-had-fun-with-rishabh-pant-shared-this-special-picture-2121579[/tw]

[tw]https://twitter.com/imshubhampathak/status/1524403121744539648?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1524403121744539648%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fsports%2Fipl%2Frr-vs-dc-ashwin-hit-fours-and-sixes-rajasthan-had-fun-with-rishabh-pant-shared-this-special-picture-2121579[/tw]

[tw]https://twitter.com/vikashpaulcomic/status/1524402714431664129?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1524402714431664129%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fsports%2Fipl%2Frr-vs-dc-ashwin-hit-fours-and-sixes-rajasthan-had-fun-with-rishabh-pant-shared-this-special-picture-2121579[/tw]

हे देखील वाचा-

Virat Kohli : खराब फॉर्मवर विराट कोहलीकडून एका वाक्यात टीकाकारांना उत्तर, म्हणाला..

Virat Kohli : ज्या-ज्या वेळी शून्यावर बाद त्या-त्या वेळी विराट हसत मैदानाबाहेर,कोहलीच्या या ‘हास्या’मागे खरं कारण काय?

IPL 2022: ‘मुंबईत आलो तेव्हा माझ्याकडं कपडे नव्हते, टॉवेलवर दोन-तीन दिवस काढले’ रोव्हमन पॉवेलनं ऐकवला तो किस्सा

Source link

Advertisement