दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली: 2 मुलांसह 3 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश, अजूनही अनेक जण अडकल्याची भीती


  • Marathi News
  • National
  • Delhi Azadpur Sabzi Mandi Accident Video Update; Five Storey Building Collapsed, Rescue Operations Underway

Advertisement

नवी दिल्ली20 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

दक्षिण दिल्लीच्या आझादपूर सबजी मंडी परिसरात सोमवारी 5 मजली इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली दबलेल्या दोन मुलांसह तीन जणांना वाचवण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाची टीम बचावकार्य करत आहे.

Advertisement

पोलिस दल आणि अग्निशमन विभागाची वाहनेही घटनास्थळी दाखल झाली आहेत. घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की इमारत कोसळण्याचा खूप मोठा आवाज ऐकू आला. ढिगाऱ्याखाली अनेक वाहनेही दबली गेली. दिल्ली अग्निशमन विभागाचे संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले की, सकाळी 11.50 वाजता घटनेबाबत त्यांच्या विभागात कॉल आला. माहिती मिळताच 7 कर्मचाऱ्यांची रवानगी करण्यात आली.

केजरीवाल यांनी ट्विट करून व्यक्त केले दुःख
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी लिहिले आहे की सबजी मंडी परिसरातील इमारत कोसळण्याचा अपघात दुःखद आहे.

Advertisement

नरेला येथे एक दिवस आधी इमारत कोसळली
याआधी रविवारीही दिल्लीच्या नरेला भागात एक इमारत कोसळली होती. मात्र, या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. नवी दिल्ली नगरपरिषदेने (NDMC) आधीच ही इमारत धोकादायक इमारत म्हणून घोषित केली होती.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here