दिल्लीच्या या खेळाडूवर संघाच्या सामनातील काही गोष्टी चोरल्याचा आरोप? या व्हिडिओने केला सत्याचा खुलासा!

दिल्लीच्या पृथ्वी शॉवर चोरीचा आरोप? चोरी करताना कॅमरात कैद
दिल्लीच्या पृथ्वी शॉवर चोरीचा आरोप? चोरी करताना कॅमरात कैद

इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सची चांगली सुरुवात झालेली दिसतेय. दोन परावभवानंतर पुन्हा कमबॅक करत कोलकात्याविरूद्धचा सामना जिंकला. दरम्यान या सामन्यात दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ मस्तीच्या मूडमध्ये दिसून आला. यावेळी पृथ्वीने टीमच्या सामनातील काही गोष्टी चोरल्याचा व्हिडीयोही व्हायरल झाला आहे.

दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीयो पोस्ट केला आहे. या व्हिडीयोच्या कॅप्शनमध्ये, आंब्याची चोरी करणाऱ्याला भेटा, असं म्हटलंय.

Advertisement

सोशल मीडियावरच्या या व्हिडीयोमध्ये पृथ्वी शॉ, एक दोन नव्हे तर तब्बल तीन आंबे चोरी करताना कॅमेरात कैद झाला आहे. यावेळी त्याच्याजवळ बसलेला ललित यादव बस असं म्हणताच, तुला काय करायचंय, असं उत्तर ताबडतोब पृथ्वी शॉ देताना दिसतोय.

पृथ्वी शॉचा हा व्हिडीयो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दिल्लीच्या अधिृकत अकाऊंटवरून अजून एक व्हिडीयो पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये पृथ्वी कर्णधार ऋषभ पंतसोबत मस्ती करताना दिसतोय. यावेळी तो पंतला फोन करून सतत त्रास देताना दिसतोय.

गेल्या सामन्यात पृथ्वी शॉने दिल्ली कॅपिटल्सकडून उत्तम असं अर्धशतक झळकावलं होतं. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पृथ्वी शॉने ५१ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये ७ चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. ड्रेसिंग रुममध्ये टीमचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनीही पृथ्वी शॉचं कौतुक केलं होतं.

Advertisement