छत्रपती संभाजीनगर9 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
संग्रहित फोटो
कन्नड – पिशोर ( प्रतिनिधी ) दि.19, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागात कृषी मंत्री अब्दुल सत्तार शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करत असून शेतकऱ्यांना धीर देत आहेत.
सत्तारांचा शेतकऱ्यांना धीर
आज कन्नड तालुक्यातील पिशोर, पळशी बुद्रुक , साखरवेल शिवारात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मंत्री अब्दुल सत्तार यांनी धीर दिला.
पंचनामा करा, प्रस्ताव सादर करा
झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करावे तसेच पंचनामा पासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही याची गांभीर्याने दक्षता घ्यावी असे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
हताश होऊ नका
राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेतील असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, संचालक डॉ. मनोज राठोड, राजेंद्र ठोंबरे, पुंडलिक काजे, उपविभागीय कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, नायब तहसीलदार श्री. राजपूत, मंडळ कृषी अधिकारी सरकलवार , कृषी सहाय्यक जगदीश पवार, एकनाथ वाघ आदी अधिकाऱ्यांसह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.