दिग्गजांनी आयपीएल सोडण्याचा सपाटा लावला; अजिंक्य रहाणे आयपीएल मधून बाहेर

दिग्गजांनी आयपीएल सोडण्याचा सपाटा लावला; अजिंक्य रहाणे आयपीएल मधून बाहेर
दिग्गजांनी आयपीएल सोडण्याचा सपाटा लावला; अजिंक्य रहाणे आयपीएल मधून बाहेर

कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल १५ व्या सीझनमध्ये प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी झगडताना दिसत आहे. अशातच ओपनर अजिंक्य रहाणे आयपीएलमधून बाहेर पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. तो आता आगामी सामना खेळणार नाही. केकेआरने आत्तापर्यंत १३ सामना खेळले आहेत ज्यामध्ये केवळ ६ सामन्यात त्यांना विजय मिळवता आलेला आहे. आयपीएल २०२२चा हंगाम शेवटाकडे चालला आहे, ज्यामुळे हळूहळू प्लेऑफचे गणित स्पष्ट होत आहे. २ वेळचा आयपीएल विजेता कोलकाता नाईट रायडर्स संघ प्लेऑफचे तिकीट मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. अशात कोलकाता संघाला मोठा झटका बसला असल्याचे समजत आहे. त्यांचा सलामीवीर फलंदाज अजिंक्य रहाणे दुखापतीमुळे उर्वरित हंगामातून बाहेर झाला आहे. क्रिकबझने या वृत्ताची पुष्टी केली आहे.

कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादसाठी खूप महत्त्वाचा होता. या सामन्यात अखेर कोलकात्याच्या टीमने बाजी मारली. मात्र तरीही कोलकात्याचा ओपनर अजिंक्य रहाणेवर टीका करण्यात आल्या. हैदराबादविरूद्ध त्याला साजेसा खेळ करता आला नाही. दुखापत होऊनही अजिंक्य रहाणे एखाद्या लढवय्याप्रमाणे मैदानावर उभा होता. हैदराबादविरूद्ध सुरुवात करताना अजिंक्य रहाणे सावध पवित्र्यात होता. यावेळी त्याने अधूनमधून मोठे फटके खेळले. मात्र उमरान मलिकने २८ रन्समध्ये अजिंक्यला माघारी धाडलं. मात्र मैदानावर फलंदाजी करत असताना अजिंक्य रहाणेला वेदनांचाही सामना करावा लागला. अजिंक्यच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले होते. यावेळी तो प्राथमिक उपचार घेऊन तो खेळत राहिला. पण, उमरान मलिकच्या ओव्हरमध्ये शशांक सिंगने अफलातून कॅच घेत अजिंक्यला पव्हेलियनमध्ये पाठवलं.

Advertisement

दरम्यान रहाणे आयपीएल २०२२मधील प्रदर्शन सरासरी राहिले आहे. तो आतापर्यंत १३ पैकी ७ सामने खेळू शकला आहे. ७ सामने खेळताना १९च्या सरासरीने १३३ धावाच करू शकला आहे. यादरम्यान त्याच्या बॅटमधून साधे अर्धशतकही निघालेले नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबाबत बोलायचे झाल्यास, जानेवारी २०२२ पासून तो संघाबाहेर आहे. त्याला आयपीएलपूर्वी मायदेशात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेसाठीही संघात निवडले गेले नव्हते. याच कारणास्तव तो आता आयपीएलधून बाहेर पडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार चार महिन्यांसाठी त्याला नॅशनल क्रिकेट अॅकडमीमध्ये पाठवण्यात येणार आहे. केकेआरने रहाणेला १ कोटी बेस प्राइसवर विकत घेण्यात आले होते. ७ मॅचमध्ये रहाणेला खेळण्याची संधी मिळाली. यावेळी त्याला केवळ १९ सरासरीने १३३ धावा करता आल्या.

आयपीएल २०२२चा हंगाम २९ मे रोजी संपेल. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करेल, ज्यामध्ये त्यांना कसोटी आणि टी२० मालिका खेळायची आहे. उभय संघांमघ्ये २०२१ साली ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली होती. या मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना कोरोनामुळे स्थगित झाला होता, जो आता २०२२मध्ये खेळवला जाणार आहे. रहाणे दुखापतीमुळे या सामन्याला मुकू शकतो.

Advertisement