दावा: खा. राऊत यांनी चौथ्यांदा जाहीर केला शिंदे सरकार पतनाचा मुहूर्त़, तीन महिन्यांत सरकारचा मृत्यू अटळ असल्याचा दावा


नाशिक31 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकार पडणार असल्याचे तीन मुहूर्त गेल्या वर्षभरात जाहीर केले. त्यानुसार काही घडले नाही. आता त्यांनी चौथा मुहूर्त जाहीर केला. तीन महिन्यांत या सरकारचा मृत्यू अटळ असल्याचा दावा त्यांनी केला.

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाने चामडे साेलेपर्यंत नागडे केल्यानंतर हे सरकार पेढे वाटत नाचत सुटले. यांच्या बेकायदेशीर निर्णयाचे पालन काेणत्याही अधिकाऱ्याने करू नये, असे आवाहनही त्यांनी पत्रकार परिषदेत केले.

काय म्हणाले राऊत?

Advertisement

ते म्हणाले की, शिंदे-फडणवीसांना दिलासा म्हणणारे न्यायालयाचा अवमान करत आहेत. यांचे चेहरेच बघा. ते अातून रडतायत. फडणवीस वकील अाहेत. त्यांनी कायद्याची पुस्तके पुन्हा चाळावीत. वकिलालाही रिव्हिजनची गरज असते. कायदा वकिलालाच नव्हे तर प्रत्येकाला कळावा अशा पद्धतीने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला. उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे पक्षप्रमुख अाहेत.

नागडे केल्यानंतर गाेडसे नाचत सुटले

Advertisement

राऊत पुढे म्हणाले की, काल न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला. ज्याला कायद्याचा फार अभ्यास नाही, त्यालाही अर्थ कळला अाहे. मात्र मिंधे गट, भाजपचे लाेक एकमेकांना पेढे भरवताय, काल एकाने व्हिडिअाे पाठवला की खासदार हेमंत गाेडसे पेढे खात नाचत हाेते. शिवसेनेत असताना ते नाचले नाहीत. न्यायालयाने नागडे केल्यानंतर नाचत आहेत.

चार पक्ष फिरलेल्या नार्वेकरांच्या हाती महत्त्वाचा निकाल

Advertisement

राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, घटनात्मक पदावर बसलेला माणूस मुलाखती देत सुटलाय हे चुकीचे अाहे. त्यांनी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व भाजप असा प्रवास केला. त्यांना राजकीय स्थैर्य वा विचार नाही. अशा व्यक्तीच्या हातात महत्त्वाचा निकाल अाहे.

त्यांना जुन्या परिस्थितीनुसार निर्णय द्यावा लागेल. माेदींनी निकालाचे पालन हाेण्यासाठी मार्गदर्शन केले नाही तर त्यांना कायद्याचे रखवालदार म्हणता येणार नाही.

Advertisement



Source link

Advertisement