दारूण पराभव: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या 3 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त, दोघांना 200च्या आत मते


मुंबईएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले आहे. 136 जागांसह काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. मात्र, या निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवारांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. मात्र, या निवडणुकीत या तिन्ही उमेदवारांचा केवळ पराभव झाला असे नाही तर त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे.

Advertisement

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाने रोण, विजापूर आणि खानापूर या मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, या तिन्ही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. एवढेच नव्हे तर दोन उमेदवारांना 150च्या पुढेही मते मिळाली नाहीत. एका उमेदवाराला 900 मतांपर्यंत मजल मारता आली.

कोणाला किती मते?

Advertisement

विजापूर शहर मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार सतीश पाटील निवडणुकीत उभे होते. त्यांना अवघे 149 मते मिळाली. दक्षिण कर्नाटकमधील गदग जिल्ह्यातील रोण या मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार कुमार अंदप्पा हकारी यांना जेमतेम 122 मते मिळाली. तर सर्वाधिक 983 मते बेळगाव जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघामधील कृष्णाजी पाटील यांना मिळाली.

कोण विजयी झाले?
रोण मतदारसंघात काँग्रेसचे गुरुप्पादा गौडा सुगना गौडा पाटील यांनी 94865 मते मिळवत विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपच्या कलाकप्पा गुरुशांतप्पा बंडी यांना 70177 मतं मिळवता आली. उद्धव ठाकरे गटाचे कुमार अंदप्पा हकारी यांना अवघी 122 मते मिळाली. परिणामी त्यांचं डिपॉझिट जप्त झालं.

Advertisement

बेळगावातील खानापूर मतदारसंघात भाजपच्या विठ्ठल हलगेकर यांचा विजय झाला. विठ्ठल हगलेकर यांना 91834 मते मिळाली आणि डॉ. अंजली निंबाळकर यांना 37205 मते मिळाली. या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार कृष्णाजी पाटील यांना 983 एवढी मते मिळाली. ठाकरे गटाच्या उमेदवारांना सर्वाधिक मते मिळवली आहेत. मात्र, त्यांनाही आपलं डिपॉझिट राखता आले नाही.

विजापूर शहर मतदारसंघात भाजपचे बसनागौडा पाटील विजयी झाले. त्यांना 94211 मते मिळाली. या मतदारसंघात ठाकरे गटाचे सतीश पाटील यांना अवघी 149 मते मिळाली.

Advertisement

संबंधित वृत्त

निवडणुकांचे वेध:‘ऑपरेशन लोटस’च्या परिणामांवर भाजपचे मंथन; कर्नाटक निकालाने महाराष्ट्र अलर्ट; भाजप, आघाडीत बैठकांचा धडाका

Advertisement

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा मोठा पराभव झाला, तर देशात पिछाडीवर असलेल्या काँग्रेसला येथील जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल दिला. शेजारी राज्यातील या निकालाने वर्षभरावर लोकसभा-विधानसभा निवडणुका आलेल्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षही खडबडून जागे झाले आहेत. प्रदेश भाजपने पुढील रणनीती ठरवण्यासाठी दोन दिवसांनी कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे, तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते पुढील आठवड्यात आगामी रणनीती ठरवण्यासाठी एकत्र बैठक घेेणार आहेत. वाचा सविस्तरSource link

Advertisement