दारुण पराभव: कर्नाटकात ऑपरेशन लोटस, हुकूमशाहीचा पराभव; मोदी-शहांची भाषणे राजकीय थिल्लरपणा, ठाकरे गटाचे टीकास्त्र


मुंबई43 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

कर्नाटकात खऱ्या अर्थाने ऑपरेशन लोटस झाले आहे. भारतातील सामान्य जनता हुकूमशाहीचा पराभव घडवू शकते, हा कर्नाटकच्या जनतेने दिलेला धडा आहे. मोदी-शहांची कर्नाटक प्रचारात झालेली भाषणे राजकीय थिल्लरपणा होता, असे टीकेचे बाण ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून सोडण्यात आले आहेत.

Advertisement

कर्नाटकात भाजपचा दारुण पराभव झाला आहे. 65 जागा मिळवत भाजपचा रथ जनतेने अडवला. या निकालावरुन ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. सामनात म्हटले आहे, उत्तर प्रदेश वगळता देशातील बहुतेक राज्यांतून भाजपचे उच्चाटन झाले आहे, ते लोकसभेतही होईल. उत्तर प्रदेशात भाजप जिंकलाच (ती शक्यता कमी) तर त्याचे श्रेय योगी महाराजांना जाईल व उत्तर प्रदेशचे भाजप खासदार विरोधी बाकांवर बसतील.

काँग्रेसचे मतभेद दिसले नाही

Advertisement

सामनात म्हटले आहे, उत्तर प्रदेश व गुजरातच्या पलीकडचा भारत मोठा आहे. काँग्रेस कर्नाटकात एकसंध होती. नेत्यांत मतभेद असले तरी त्यांनी ते निवडणुकीच्या दरम्यान उघड केले नाहीत. मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा ज्यांना होती असे डी. शिवकुमार, सिद्धरामय्या यांनी ‘हायकमांड’वर सर्वकाही सोपवून प्रचारात झोकून दिले.

हिंदू-मुसलमानांत तेढ

Advertisement

सामनात म्हटले आहे, मुळात कर्नाटकातले भाजपचे बोम्मई सरकार भ्रष्टाचार व लुटमारीच्या प्रकरणात पूर्ण बदनाम झाले होते. शिवाय महागाई, बेरोजगारी हे महत्त्वाचे मुद्दे होते व त्यावर न बोलता भाजपवाले व त्यांचे दिल्लीचे नेते हिंदू-मुसलमानांत तेढ निर्माण करून लोकांना भरकटवत राहिले, अशी टीकाही यावेळी करण्यात आली.

‘विकास पुरुषा’चा पराभव

Advertisement

सामनात म्हटले आहे,काँग्रेसने जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदीची भाषा करताच मोदी वगैरेंनी ‘हा बजरंग बलीचा अपमान आहे, अशी बोंब ठोकून प्रचारात बजरंगबलीस उतरवले. काँग्रेसने बजरंगबलीचा अपमान केला म्हणून भाजपास विजयी करा, असे सांगणे हा मोदी या ‘विकास पुरुषा’चा पराभव आहे. मोदींनी प्रचारात बजरंगबलीस उतरवले व मतदानाच्या दिवशी हनुमान चालिसासारखे कार्यक्रम करायला लावले. या सगळ्याचा काहीएक परिणाम कर्नाटकात झाला नाही. उलट बजरंगबलीने गरागरा गदा फिरवून ती मोदी-शहांच्याच टाळक्यात हाणली व विजयी गदा राहुल गांधींच्या खांद्यावर ठेवली हे स्पष्ट आहे.

भाजपची कुवत नाही

Advertisement

सामनात म्हटले आहे, कर्नाटकचे चित्र कधी नव्हे इतके स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे बहुमत इतके पक्के आहे की, भारतीय जनता पक्ष तेथे फोडाफोडी करून सत्ता काबीज करण्याचे स्वप्नदेखील आता पाहू शकत नाही. महाराष्ट्राप्रमाणे एखादा पहाटेचा शपथविधी घडवून आणण्याची कुवतही कर्नाटकातील भाजपात नाही.

संबंधित वृत्त

Advertisement

कर्नाटक:सिद्धरामय्या यांना अनुभवाचा लाभ मिळेल की डीकेंना तपस्येचे फळ? सीएम निवडीचे अधिकार खरगेंना

कर्नाटकमध्ये बहुमत मिळवल्यानंतर काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री निवडीच्या प्रक्रियेला वेग आल्याचे दिसते. पक्षाने सुशीलकुमार शिंदे, जितेंद्रसिंह व दीपक बाबरिया यांना निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. हे तिन्ही ज्येष्ठ नेते रविवारी सायंकाळी बंगळुरूत दाखल झाले. त्यानंतर विधिमंडळ पक्षाची बैठक एका खासगी हॉटेलमध्ये झाली. त्यात निवडीचे अधिकार खरगेंकडे सोपवण्यात आले. बैठकीपूर्वी वेणुगोपाल व निरीक्षकांनी मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सिद्धरामय्या व डी.के. शिवकुमार यांच्यासोबत बैठक घेतली. रात्री उशिरा निरीक्षकांनी आमदारांशीही सल्लामसलत केली. आता सोमवारी निवडणूक प्रभारी रणदीप सुरजेवाला यांच्यासह कर्नाटकचे सर्व वरिष्ठ नेते दिल्लीला पोहोचणार आहेत. वाचा सविस्तर

AdvertisementSource link

Advertisement