दहीहंडी निम्मित पुण्यातील मध्यभागातील वाहतुकीत बदल: पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा वाहतूक विभागाचे आवाहन

दहीहंडी निम्मित पुण्यातील मध्यभागातील वाहतुकीत बदल: पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा वाहतूक विभागाचे आवाहन


पुणेएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पुणे शहरातील विविध भागात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात स्जकर करण्यात येत आहे. अनेक मंडळांनी तर याची तयारी मागच्या आठवड्या पासून सुरु केली आहे.

Advertisement

यानिमित्ताने विशेषतः शहरातील मध्यभागातील शिवाजीरोड, लक्ष्मीरोड, बाजीराव रोड, टिळक रोड सायंकाळी 5 ते दहीहंडी फुटे पर्यंत बुधवार चौक ते दत्तमंदिर चौक तसेच बेलबाग चौक ते सेवासदन चौक, बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक, मंडई चौक ते (बाबू गेनू चौक), साहित्य परिषद चौक नवी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये वाहतूक व्यवस्थेंत बदल करण्यात आला आहे. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

  • शिवाजीरोड वरुन स्वारगेटला जाण्यासाठी : स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजी बाबा चौक, टिळक चौक-पुढे टिळक रोडने, शास्त्री रोडने इच्छित स्थळी जावे .
  • पुरम चौकातुन बाजीराव रोडवरून शिवाजीनगर कडे जाण्यासाठी पुरम चौकातुन टिळक रोडने – अलका टॉकीज चौक व पुढे एफ.सी.रोडने इच्छित स्थळी जावे. तसेच पुरम चौकातुन सेनादत्त चौकाकडे व पुढे इच्छित स्थळी जाता येईल.
  • स. गो. बर्वे चौकातुन पुणे मनपा भवनकडे जाण्यासाठी : स. गो. बर्वे चौकातुन जंगली महाराज रोडने – झाशी राणी चौक डावीकडे वळुन इच्छितस्थळी जावे.
  • बुधवार चौकाकडुन आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतुक असणार आहे. आप्पा बळवंत चौकातुन बुधवार चौकाकडे येणारी वाहतुक बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जाता येईल .
  • रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे येणारी वाहतुक बंद करण्यात आली आहे. पर्यायी मार्गाचा वापर करावा.
  • सोन्या मारुती चौकाकडुन लक्ष्मी रोडने सरळ सेवासदन चौकाकडे वाहतुकीकरिता बंद करण्यात आला आहे. वाहने सोन्या मारुती चौकातुन उजवीकडे वळुन फडके हौद चौकातुन इच्छित स्थळी जात येईल.
  • शिवाजी रोडवरुन जिजामाता चौकातून गणेश रोडने दारुवाला पुलकडे जाणारी वाहतूक हि गाडगीळ पुतळा येथून डाव्या बाजूने कुंभारवेस चौक- पवळे चौक- जुनी साततोटी पोलीस चौकी मार्गे इच्छितस्थळी जात येईल.
  • गणेश रोडवरील संपूर्ण वाहतूक हि दारुवाला पुल येथून बंद राहिल. तसेच देवजीबाबा चौक व फडके हौद चौकात वाहतूक बंद करण्यात येईल. वाहनचालकांनी अपोलो टॉकिज, नरपतगिरी चौक, दारुवाला पूल. दुधभट्टी या मार्गाचा वापर करावे असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.Source link

Advertisement