मंदार जाेशी / गिरीश काळेकर | छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
रोहिदासपुरा येथे गोविंदा पथक सराव करताना.
- बक्षीस फक्त घोषणेपुरतेच, पूर्ण बक्षीस टाळण्याकरिता स्पर्धेसाठी जाहीर करतात १० थरांची अट
आगामी लोकसभा, विधानसभा आणि मनपा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या वर्षी तरुणांना आकर्षित करण्यासाठी दहीहंडीचे जोरदार नियोजन करण्यात आले आहे. भव्यदिव्य स्टेज, सेलिब्रिटी आणि लाखो रुपयांच्या बक्षिसांची घोषणा केली आहे. मात्र, प्रत्यक्षात सलामीसाठी देण्यात येणाऱ्या काही हजारांच्या बक्षिसावरच गोविंदा पथकांना समाधान मानावे लागते. ही रक्कम पाच हजारांपासून २१ हजारांपर्यंत असते, अशी खंत गोविंदा पथकांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली. शहरात गोविंदा पथके सर्वाधिक सात थर लावतात. मात्र आयोजक दहीहंडी दहा थरांच्या उंचीवर बांधतात. त्यामुळे कोणतेही पथक दहीहंडी फोडू शकत नाही. त्यामुळे लाखांचे बक्षीस जाहीर केले असले तरी आयोजक केवळ ५ ते २१ हजार रुपये देऊन पथकांची बोळवण करतात. त्यामुळे उंचीचा निकष न ठेवता सर्वात कमी वेळेत सर्वाधिक थर लावणाऱ्या पथकाला बक्षिसाची पूर्ण रक्कम द्या, अशी मागणी गोविंदा पथकांनी केली आहे. एका गोविंदा पथकाला सराव आणि प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी, सुरक्षेसाठी किमान एक लाख रुपयांचा खर्च येतो. बक्षिसांची रक्कम मात्र तोकडी असल्यामुळे खिशातून पैसे टाकून पथकाचे व्यवस्थापन करावे लागते. शहरातील कॅनॉट प्लेस, निराला बाजार, गुलमंडी आणि टीव्ही सेंटर, बजरंग चौक, बजाजनगर या भागात महोत्सव होणार आहे.
कमी वेळेत थर लावणाऱ्यांना बक्षीस द्या
उंचीबरोबरच सर्वाधिक थर, सर्वात कमी वेळेत लावणाऱ्या गोविंदा पथकाला पूर्ण बक्षीस द्यावे. त्यामुळे मंडळांवरचा गोविंदा पथकांचा विश्वास वाढेल आणि महोत्सवात अजून रंगत येईल.
– श्री संस्थान गणपती दहीहंडी गोविंदा पथक
सलामीच्या बक्षिसांची रक्कम वाढवा
शहरात सगळ्या गोविंदा पथकांचे सहा ते सात थर लागतात. मात्र, हंडी त्यापेक्षाही उंच असते. त्यामुळे मंडळांनी सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांच्या बक्षिसांची रक्कम वाढवावी. त्यामुळे गोविंदा पथकांचा उत्साह वाढेल.
– सोमनाथ रमेश उणे, रोहिदासपुरा गोविंदा पथक
नमो दहीहंडी उत्सव मंडळ
स्थळ : बजरंग चौक, पुंडलिकनगर रोड व पहाडे कॉर्नर
बक्षिसे : ठरलेली नाहीत
संयोजक : मंत्री अतुल सावे
मनसेची राजयोग दहीहंडी
स्थळ : निराला बाजार, टीव्ही सेंटर
बक्षिसे : १ लाख ११ हजार
संयोजक : सुमीत खांबेकर
धर्मरक्षक दहीहंडी
स्थळ : टीव्ही सेंटर चौक
बक्षिसे : १ लाख ५१ हजार
उपक्रम : पाच जणांना धर्मरक्षक पुरस्कार
संयोजक : बाळासाहेब थोरात
आर. बी. युवा मंच
स्थळ : कॅनॉट प्लेस
बक्षिसे : ५१ हजार
संयोजक- राहुल बोरोले
स्वाभिमान क्रीडा मंडळ
स्थळ : कॅनाॅट प्लेस
बक्षीस : १ लाख ११ हजार १११ रुपये
संयोजक : प्रमोद राठोड
भाजपची जय श्रीराम दहीहंडी
स्थळ : टी. व्ही. सेंटर
बक्षिसे – १ लाख ५१ हजार
खास : अनाथ बालिकांच्या हस्ते दहीहंडी फोडली जाईल.
संयोजक : राज वानखेडे
देवकीनंदन दहीहंडी उत्सव
स्थळ : गुलमंडी
बक्षिसे : ३ लाख ५० हजारांची बक्षिसे
संयोजक : आमदार प्रदीप जैस्वाल
अश्वमेध क्रीडा दहीहंडी मंडळ
स्थळ : महात्मा फुले चौक, औरंगपुरा
बक्षिसे : १ लाख ११ हजार रुपये
संयोजक : अनिल मकरिये
गोपाळा दहीहंडी
स्थळ : गुलमंडी
बक्षिसे : ४ लाखांची बक्षिसे
संयोजक : माजी आ. किशनचंद तनवाणी