दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई: पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या कार्यकाळातील 42 वी कारवाई

दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई: पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या कार्यकाळातील 42 वी कारवाई


पुणे8 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

सहकारनगर भागात दहशत पसविणाऱ्या अट्टल गुन्हेगारा विरोधात पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. ही 42 वी कारवाई आहे.सुरज उर्फ दमऱ्या राजू गायकवाड (वय- 32, रा. तळजाई माता वसाहत, पद्मावती, सहकारनगर,पुणे) असे स्थानबद्धतेची कारवाई आलेल्याचे नाव आहे.

Advertisement

सुरज गायकवाड हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यवर मागच्या पाच वर्षात सहा गंभीर गुन्हे दाखल आहे. त्याने साथीदारसह सहकारनगर, बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोखंडी पालघन, कोयता. बांबू यासारख्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, लोकसेवकावर हमाल करणे, जबरी चोरी, घातक शस्त्राने दुखापत करणे, दंगा यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्याच्या दहशतीमुळे कोणी तक्रार करण्यास धजावत नव्हते. त्यासामुळे पोलिस आयुक्तांनी त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.त्यांनी केलेली ही एमपीडीची 42 वी कारवाई आहे.

सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Advertisement

पुणे शहरातील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणाऱ्या एका सराईत आरोपीला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. बिरा रामदास श्रीराम (वय -३५, रा. भावडी, ता. हवेली,पुणे) असे तडीपार केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.बिरा श्रीराम वर तीन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या हालचाली सार्वजनिक शांततेस व सुव्यवस्थेंस धोका निर्माण करणाऱ्या अशा होत्या. सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील लोणीकंद पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार प्रशांत कापुरे, सागर यांनी बिरा श्रीराम याच्यावर गुन्हाच अभिलेख तपासून तडीपार करण्या संदर्भात पोलीस उपायुक्त परिमंडळ चारचे शशिकांत बोराटे यांना पाठवला असता त्याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले.Source link

Advertisement