दहशतवाद आणि तिरस्कार पसरवणाऱ्या 1000 ग्रुप्सवर फेसबुकची बंदी


  Advertisement

  Facebook Bans about 1,000 Militarised Social Movements : सोशल मीडियावर दहशतवाद किंवा तशा स्वरुपाच्या पोस्ट आणि हालचालीशी संबंधित 1000 ग्रुप्सवर बंदी घातली आहे. अशा पेज, ग्रुप्सची यादी लीक झाल्यानंतर फेसबुकने ही कारवाई केली आहे. सोशल नेटवर्कवरील धोकादायक व्यक्ती आणि संघटनांची यादी फेसबुकने तयार केली होती. फेसबुकने दहशतवादाच्या वर्गातील बहुतेक नावं थेट अमेरिकन सरकारकडून घेतली आहेत. द इंटरसेप्टने अहवाल दिला आहे, ज्याची यादी प्रथम फेसबुकनं प्रकाशित केली आहे. 

  एका अहवालानुसार, धोकादायक दहशतवादाच्या यादीतील अंदाजे 1,000 नोंदी, एसडीजीटी किंवा विशेषतः जागतिक दहशतवादी घोषित केलेल्या व्यक्तींची नोंद करण्यात आली आहे. ही यादी ट्रेझरी विभागानं तयार केलेल्या निर्बंधांची यादी आहे. ही यादी 11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर तात्काळ जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या निर्देशानंतर तयार करण्यात आली होती. 

  Advertisement

  फेसबुकच्या या यादीमध्ये जागतिक स्तरावर दहशतवादी घोषित करण्यात आलेल्या लोकांच्या पासपोर्ट, वैयक्तिक माहिती आणि फोन नंबरचाही समावेश आहे. याचं पुनरावलोकन करणाऱ्या ब्रेनन सेंटर फॉर जस्टीस फ्रीडम अँड नॅशनल सिक्युरिटी प्रोग्रामच्या सह-संचालक फैजा पटेल यांनी सांगितले की, याद्या दोन वेगवेगळ्या प्रकारामध्ये तयार केल्या आहेत, ज्यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम क्षेत्र आणि समुदायांना सर्वात जास्त दंड लागू केला जातो.

  पटेल यांनी पुढे बोलताना सांगितलं की, साऊथर्न पॉवर्टी लॉ सेंटरने मुस्लिम समुदायाच्या विरोधात द्वेष आणि तिरस्कार पसरवणाऱ्या गटांची यादी जाहीर केली होती. या यादीतील बहुतांशी गटांचा उल्लेख फेसबुकच्या या यादीत नाही. फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मचा वापर समाजातील कोणत्याही गटाविरोधात द्वेष किंवा तिसस्कार पसरवण्यासाठी करु देत नाही. असा वापर करणाऱ्या गटांवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारची यादी तयार करण्यात येते आणि वेळेप्रमाणे त्यावर बंदी आणली जाते.

  Advertisement

  महत्त्वाच्या इतर बातम्या :   Source link

  Advertisement

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here