दरेकर महिलांची माफी मागा: माफी मागा अन्यथा थोडाब लाल करू! राष्ट्रवादीला रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष म्हणणाऱ्या दरेकरांना रुपाली चाकणकर यांचा इशारा!


Advertisement

40 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या टीकेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, “आपल्या बोलण्यातून वैचारिक दारिद्र्य दिसून येत आहे. आपल्या पक्षातील महिलांची काय स्थिती असेल हे आपल्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. प्रवीण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्याबद्दल तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकतं,” असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे.

Advertisement

दरेकरांच्या वक्तव्यामध्ये अश्लील अर्थ नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Advertisement

प्रवीण दरेकर काय म्हणाले?
प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे की, गरीबाला, छोट्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं, सत्ता देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच देऊ शकते. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरीबाकडे बघायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे. सुभेदारांचा पक्ष, कारखानदारांचा पक्ष, बँकावाल्यांचा पक्ष, उद्योगपतींचा पक्ष, भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्यांचा पक्ष,” असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here