दप्तरमुक्त शाळा उपक्रम: विद्यार्थ्यांनी शाळेत बनवल्या पिठलं अन् भाकरी, गुरुजींनी मनसोक्त मारला ताव

दप्तरमुक्त शाळा उपक्रम: विद्यार्थ्यांनी शाळेत बनवल्या पिठलं अन् भाकरी, गुरुजींनी मनसोक्त मारला ताव


औरंगाबादएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

लासूरगाव येथील आदर्श जिल्हा परिषद शाळेत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पिठ्ठल भाकरीवर चक्क गुरुजींनीच ताव मारला. आपण बनवलेली कच्ची पक्की भाकरी सर आणि ताईंनी खाऊन दिलेल्या शाब्बासकीने विद्यार्थी भारावले. विद्यार्थ्यांमधील पाक कलेला व्यासपीठ देण्यासाठी हा उपक्रम शाळेत राबविण्यात आला.

Advertisement

विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षणाचा आनंद घेता यावा. यासाठी दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा उपक्रमांत विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यात यावा, अशा सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिल्या आहेत. याची अंमलबजावणी करत शहरालगत असलेल्या लासूर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळेत शनिवारी विद्यार्थ्यांच्या पाककलेला वाव देण्यासाठी पिठ्ठल भाकरी बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांना दीड तासात पिठ्ठल आणि भाकरी बनवण्यास सांगण्यात आले होते. चुलीवर बनवलेल्या विद्यार्थ्यांच्या या भाकरी, पिठ्ठलाने पालकही चकीत झाले. चौथी ते पाचवीच्या वर्गातील प्रत्येकी 3 विद्यार्थी असलेले 17 गट या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यापैकी 3 विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

या स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षणाबरोबरच त्यांच्या कलागुणांवा वाव मिळावा. त्यांच्या समान विचारधारा निर्माण व्हावी. यासाठी दप्तरमुक्त शाळेत उपक्रम राबविण्यात आला, अशी माहिती शिक्षक सनी गायकवाड यांनी या प्रकरणी दिली.

Advertisement



Source link

Advertisement