दखल : विशेष मुलांची यशोगाथा | success story of special children disability Divya Bharari book Writer Shobha Nakhre amy 95



‘दिव्य भरारी’ हे पुस्तक म्हणजे अपंगत्वावर मात करून यशाच्या वाटेवर मार्गक्रमण करणारी मुलं आणि त्यांना तो मार्ग दाखविण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या त्यांच्या आईबाबांची गोष्ट! लेखिका शोभा नाखरे या अशा मुलांसाठी गेली अनेक र्वष काम करीत आहेत. त्यामुळे या विशेष मुलांविषयीची तळमळ, जिव्हाळा आणि उत्कट आत्मीयता त्यांच्या लिखाणात आढळून येते. या मुलांची यशोगाथा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीच हा पुस्तकप्रपंच त्यांनी मांडला आहे.

Advertisement

कर्णबधिर, दृष्टिहीन, डाऊन सिंड्रोम, ऑटिस्टिक, विकलांगता या शारीरिक मर्यादांवर यशस्वी मात करत आपला मार्ग यशस्वीपणे धुंडाळणाऱ्या मुलांची जीवनगाथा वाचून त्यांचे मनापासून कौतुक करावेसे वाटते. या मुलांनी अभ्यासाबरोबरच अन्य कला आणि खेळ कसे जोपासले, त्यासाठी पालकांनी घेतलेल्या अपार कष्टांची नोंद लेखिकेने या पुस्तकात घेतली आहे. आपल्या पदरी आलेल्या अपंग मुलाचा दोष नशिबाला न देता ते सत्य वास्तव म्हणून स्वीकारून या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणाऱ्या पालकांची आणि त्यांचे प्रयत्न यशस्वी करून दाखविणाऱ्या मुलांची कथा या पुस्तकात आहे. प्रत्येक सुजाण पालकाला नवीन ऊर्जा देणारं हे पुस्तक आवर्जून वाचावं असं आहे.
दिव्य भरारी’- शोभा नाखरे,
प्रकाशक- रामचंद्र प्रतिष्ठान,
पाने-९६, किंमत- १५० रुपये. ६





Source link

Advertisement