दखल : वाघांचे पर्वतभ्रमणएक्स्प्रेस वृत्त सेवा – [email protected]
गेल्या आठवडय़ात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा झाला. उत्तराखंड सरकारने आपल्या राज्यात वाघांचा अधिवास जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानापासून केदारनाथ वन्यजीव अभयारण्यापर्यंत एवढय़ा प्रचंड परिसरात पसरल्याचे अभिमानाने सांगितले. इथे तेराईपासून (हिमालयाच्या पायथ्याशी असलेले दलदलीचे जंगल) पर्वतापर्यंत वाघाच्या वावर आहे. ‘राज्यात समुद्रसपाटीपासून एक हजार १८१ फूट (३६० मीटर) उंचीपासून ते तब्बल १२ हजार ७३ फूट (३६८० मीटर) उंचीपर्यंत वाघ आढळतात. हे उत्तराखंड सरकारने व्याघ्र संरक्षण-संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांना आलेले यश आहे,’ असा दावाही मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केला.

Advertisement

वाघ सामान्यपणे समुद्रसपाटीपासून सहा हजार फूट उंचीपर्यंतच्या परिसरात (एक हजार ८०० फुटांच्या खाली) आढळतात. त्यामुळे केदारनाथ मंदिराच्या उंचीवर वाघ आढळणे हा अपवादच! पण काही मोक्याच्या ठिकाणांवर लावलेल्या आणि हालचालींमुळे कार्यान्वित होणाऱ्या कॅमेऱ्यांनी याहून अधिक उंचीवरही वाघांची छायाचित्रे टिपली आहेत. हिमालयातील आपल्या अधिवासांपेक्षा बऱ्याच जास्त उंचीवर वाघ आढळल्याचे दाखले अनेक दंतकथा आणि लोकवाङ्मयात आढळतात, मात्र तथाकथित बर्फाळ प्रदेशातील वाघांबद्दल कुतूहल वाढले ते २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या बीबीसीच्या माहितीपटामुळे. ‘लॉस्ट लॅण्ड ऑफ टायगर्स’ या माहितीपटात ‘भूतानच्या पर्वतांमधील नामशेष झालेल्या वाघांचा शोध’ घेतल्याचा दावा करण्यात आला होता. या दाव्यात काहीही तथ्य नसल्याचे वन्यजीव संवर्धकांनी स्पष्ट करूनही, हा माहितीपट जगभर चर्चेचा विषय ठरला होता. खरे तर भूतानमध्ये वाघ आढळल्याचा छायाचित्र स्वरूपातील पुरावा २००० सालीच नोंदवण्यात आला होता. हा वाघ नऊ हजार ७२८ फूट (२९६५ मीटर) उंचीवर फ्रमसेंगला राष्ट्रीय उद्यानात आढळला होता. तेव्हा वाघ आढळण्याचे हे सर्वाधिक उंचीचे स्थान ठरले होते.

अल्पावधीतच वाघ आढळण्याच्या उंचीचा आणखी एक नवा विक्रम नोंदवला गेला. हा प्रौढ नर वाघ होता आणि तो जिग्मे दोर्जी राष्ट्रीय उद्यानात १३ हजार ७८० फूट (चार हजार २०० मीटर) उंचीवर आढळल्याचे नोंदवण्यात आले. २०१० मध्ये जगभर निर्माण झालेल्या कुतूहलानंतर भूतानमध्ये समुद्रसपाटीपासून उंचावर असलेल्या प्रदेशांत वाघांची अनेक छायाचित्रे टिपली गेली. यात ११ हजार फूट उंचीवर टिपण्यात आलेल्या पहिल्या हाय रेझोल्युशन छायाचित्राचाही समावेश होता. हे छायाचित्र २०१७ मध्ये डब्लूडब्लूएफ- यूकेसाठी टिपण्यात आले होते. २०२० मध्ये नेपाळमध्येही पर्वतरांगांमध्ये दोन ठिकाणी वाघांची छायाचित्रे टिपण्यात आली. त्यापैकी एक दाडेलधुरा येथे आठ हजार २०० फुटांवर तर दुसरे नोव्हेंबरमध्ये कांचनजुंगा येथे १० हजार ४०० फुटांवर टिपण्यात आले.

Advertisement

भारतीय लोकवाङ्मयात अतिउंच प्रदेशांत वाघ आढळल्याचे अनेक दाखले आहेत. शिकारकथा आणि साहसकथांमध्येही याविषयी उल्लेख आढळतात. ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी एफ. एम. बेली यांनी १९१२ च्या सुमारास तिबेट आणि आसाममधील हिमालयीन पर्वतरांगांमधील मोहिमांच्या नोंदींत मिश्मी हिल्स भागातील अतिउंच प्रदेशातील वनांत वाघ आढळल्याचे उल्लेख केले आहेत.

निसर्गतज्ज्ञ एच. एस. प्रॅटर (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी) यांनी हिमालयात दहा हजार फुटांवर हिवाळ्यात पडलेल्या बर्फात वाघाच्या पाऊलखुणा आढळल्याचे नमूद केले आहे. आपल्या ‘मॅन इटर्स अ‍ॅण्ड मेमरीज’ या पुस्तकात (१९५९) भारतीय वन सेवेतील अधिकारी जे. ई. कॅरिंग्टन टर्नर यांनी गोरी व्हॅलीमध्ये एक मनुष्यभक्षक वाघाची शिकार केल्याचे नमूद केले आहे. हा भाग आता उत्तराखंडमधील पिथोरगड जिल्ह्य़ात आहे. मानववंशशास्त्रज्ञ अरनॉल्ड हेन्री यांनी आपल्या ‘फॉर्बिडन लॅण्ड’ या पुस्तकात उत्तराखंडमधील आदिवासी जमातीतील राजवर नामक व्यक्तीने आपल्याला वाघाच्या शिकारीला जाण्यासाठी पाचारण केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

अलीकडच्या काळात २००९ मध्ये दहा हजार फुटांवर असलेल्या जेलेप ला या सिक्कीम आणि तिबेटमधील स्वायत्त भूभागाशी जोडणाऱ्या घाटात ७० मीटरच्या पट्टय़ात वाघाच्या पावलांचे ठसे आढळले होते. जानेवारी २०१४ मध्ये अरुणाचल प्रदेशात दिबंग जिल्ह्य़ामध्ये वाघाची छायाचित्रेही टिपण्यात आली होती. हा वाघ तुलनेने कमी उंचीवर म्हणजेच पाच हजार ८०० फुटांवर आढळला होता. २०१६पासून दहा हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर वाघ आढळल्याची अनेक उदाहरणे आहेत.

काळजीचा मुद्दा

वन्यजीव संवर्धकांच्या एका गटाच्या दृष्टीने एरवीपेक्षा अधिक उंचीवर वाघ आढळण्याच्या प्रमाणात झालेली वाढ चिंताजनक आहे. त्यांच्या मते हवामान बदलांमुळे उंचावरील भाग वाघांसाठी सुसह्य़ ठरू लागले आहेत. ते बर्फातही फिरताना दिसत असल्यामुळे थंडी हा त्यांच्या भ्रमंतीतील अडथळा नसल्याचेही दिसते. वाघ नेहमीच त्यांच्या अधिवासापासून दूरवरच्या प्रदेशांत मनसोक्त भटकंती करत आले आहेत, हे स्पष्टीकरणही देता येऊ शकते. आता त्यांच्या निरीक्षणासाठी अधिक चांगल्या प्रकारे प्रयत्न होत आहेत आणि त्यांची छायाचित्रे टिपण्यासाठी उत्तम दर्जाचे कॅमेरेही उपलब्ध आहेत. याचा फायदा त्यांच्याविषयी अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी होत आहे. एखाद्या विशिष्ट भागात त्या भागाबाहेरही भ्रमंती करतील एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वाघ असणे हे केव्हाही चांगलेच लक्षण आहे, पण त्यातून अतिउंच भागाला वाघांचा अधिवास म्हणून जाहीर करण्यासारखे निर्णय घाईगडबडीत घेणे किंवा वाघाच्या काही छायाचित्रांच्या आधारे संरक्षित क्षेत्रात बदल करणे योग्य ठरणार नाही.

Advertisement

ज्याप्रमाणे सर्बियन वाघ खरोखरच सर्बियात राहत नाहीत. ते एका विशिष्ट प्रकारचे वृक्ष असलेल्या प्रदेशांत आढळतात; त्याचप्रमाणे बर्फाळ भागात आढळणारे वाघ त्या प्रदेशात स्थिरावलेले नसतात. त्यांचे अस्तित्व त्या बर्फाळ भागांच्या खाली असलेल्या वनांवरच अवलंबून असते. बर्फाळ भाग हा त्यांच्या पारंपरिक अधिवासाला पर्याय ठरू शकत नाही.

The post दखल : वाघांचे पर्वतभ्रमण appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement