दखल : कोकणातील नमन-खेळे यांची माहिती‘कोकणातील नमन-खेळे’ हे सूर्यकांत आजगांवकर यांचे पुस्तक नमन-खेळे यांविषयी उत्तम माहिती देते. पुस्तकाच्या सुरुवातीला लोकसाहित्याच्या स्वरूपाविषयी माहिती देण्यात आली आहे. ‘लोकसाहित्य’ या शब्दाची उत्पत्ती, लोकसाहित्य म्हणजे काय, लोकसाहित्यात कुठल्या गोष्टींचा समावेश होतो, त्याचे प्रयोजन, लोकसाहित्याबद्दल अभ्यासकांनी मांडलेले विचार यांचा ऊहापोह केला आहे. ‘कोकणाचा कुणबी समाज व त्यांची संस्कृती’ या प्रकरणात कुणबी समाजाच्या धर्मसंकल्पना आणि त्यांच्यात प्रचलित परंपरांची मांडणी केलेली आहे. नमन-खेळे यांच्यासंबंधी माहीतगारांनी सांगितलेले वेगवेगळे अर्थ लेखक उद्धृत करतात. वेगवेगळ्या गावांतील देवतांप्रमाणे नमनाच्या प्रकारात कसा बदल होतो, नमन-खेळे याविषयी विविध अभ्यासकांनी नोंदविलेली निरीक्षणेही लेखक देतात. त्याचप्रमाणे नमन-खेळे यांचे प्रयोजन काय, या खेळांतील देवतांचे अवतरण, या खेळांचा हंगाम, पूर्वतयारीचे स्वरूप, खेळांची संहिता यांची माहिती या पुस्तकात दिली आहे. पुस्तकात काही नमन-खेळे यांच्या संहिताही देण्यात आल्या आहेत.

Advertisement

‘कोकणातील नमन-खेळे’- सूर्यकांत आजगांवकर, ललित पब्लिकेशन, पाने- १७०, किंमत- २३० रुपये  ६

मार्गदर्शक पाऊलखुणा…

Advertisement

‘पाऊलखुणा’ हे व्यास क्रिएशनतर्फे प्रकाशित झालेलं पुस्तक म्हणजे विजय महाजन या उद्योजकाच्या यशस्वी वाटचालीचं प्रांजळ आत्मकथन आहे. या पुस्तकाचं ओघवत्या भाषेत शब्दांकन केलंय संपदा वागळे यांनी! ध्येय गाठण्यासाठी घेतलेले अपार कष्ट, मार्गातील अनंत अडचणी, अचूक व कणखर निर्णय, जोडलेली जीवाभावाची माणसं यांतून हा प्रवास उलगडत जातो. हातोटी, सचोटी व चिकाटी ही महाजनांच्या यशाची गुरुकिल्ली पुस्तकाच्या पानापानांतून जाणवते. त्यांचा अत्युत्तमाचा ध्यास त्यांच्या कंपनीला-‘सुप्रा केमिकल्स’ला सुप्रीमतेकडे घेऊन गेल्याचं दिसून येतं. मात्र हे पुस्तक म्हणजे केवळ एक व्यावसायिक आलेख नाही, तर लेखकाचे समृद्ध बालपण, कॉलेजमधील मस्तीचे दिवस, माणगावमध्ये बारा एकराच्या फार्महाऊसवर सहचारिणीसह फुलवलेली हिरवीगार बाग आणि जीवनाच्या विविध टप्प्यांवर लाभलेली स्नेहसोबत यांचीही ही स्मरणगाथा आहे. आपल्या मनोगतात विजय महाजन लिहितात… ‘माझ्या पाऊलखुणा वाचून धंद्यात संघर्ष करणाऱ्या एका व्यावसायिकाला जरी प्रकाशवाट सापडली तरी या पुस्तकाचं सार्थक झालं असं मी समजेन…’ हे पुस्तक नवउद्योजकांसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो.

‘पाऊलखुणा’- विजय महाजन, 

Advertisement

व्यास क्रिएशन्स, पाने- १७६, किंमत- २२५ रुपये

The post दखल : कोकणातील नमन-खेळे यांची माहिती appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement