थंडीची तीव्रता कमी होताच कारागृह प्रशासनाला जाग: कैद्यांना मिळणार आंघाेळीस गरम पाणी, सतरंजी, चादरी अन् उशा…!


पुणे14 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

कडाक्याची थंडी असल्याने कैद्यांना कारागृहात आंघाेळीसाठी गरम पाणी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कारागृह प्रशासनाने शुक्रवारी दिली आहे. मात्र थंडीची तीव्रता कमी होताच कारागृह प्रशासनाने अशाप्रकारचा निर्णय घेणे हास्यास्पद असल्याचे बोलले जात आहे. हा निर्णय घेण्यास उशीर तर झाला नाही ना या गोष्टीचा विचार करण्याची प्रशासनाला गरज आहे.

Advertisement

राज्य कारागृह विभागाचे वतीने कारागृह विभागाचे सर्व कारागृह उपमहानिरीक्षक व सर्व मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक यांच्यासाेबत कारागृह विभागातील अडीअडचणी जाणून घेण्यासाठी व त्या दूर करण्यासाठी उपाययाेजना करण्यासाठी कारागृह महानिरीक्षक व अपर पाेलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

आंघाेळीसाठी गरम पाणी

Advertisement

कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी राज्यातील विविध कारागृहांना भेटी दिल्या. त्यावेळी अनेक कैद्यांनी सध्या कडाक्याची थंडी सुरु असल्याने आंघाेळीसाठी गरम पाणी उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी केली. त्याप्रमाणे सर्व कारागृह अधीक्षकांनी कैद्यांना गरम पाणी उपलब्ध हाेईल याकडे लक्ष्य देण्याचे सूचना देण्यात आलेल्या आहेत.

सतरंजी, चादर, उशी मिळणार

Advertisement

कारागृह भेटीवेळी अनेक बंद्यांनी सध्या कडाक्याची थंडी असल्याने सतरंजी, चादर, उशी ही उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. त्याप्रमाणे सर्व कारागृह अधीक्षकांना बंदयांना झाेपण्यासाठी आवश्यक सामान पुरवण्यात यावे आणि आवश्यकता भासल्यास ज्या कारागृहात या वस्तू तयार करण्यात येतात त्यांच्याकडे मागणी नाेंदवून वस्तू उपलब्ध करुन घेण्यात याव्यात अशा सूचना दिल्या आहे.

काॅईन बाॅक्सची संख्या वाढवणार

Advertisement

कारागृह भेटीवेळी बंद्यांच्या भेटीसाठी कारागृहाबाहेर माेठया प्रमाणात गर्दी दिसून आली. त्यासाठी सर्व बंद्यांच्या भेटी वेळेत पूर्ण हाेण्यासाठी आणखी मुलाखतसाठीच्या खिडकी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे काॅईन बाॅक्स सुविधेचा वापर करण्यासाठी ही माेठया प्रमाणात गर्दी हाेत असल्याने, सर्व बंद्यांना सदर सुविधा वेळेवर उपलब्ध हाेण्यासाठी काॅईन बाॅक्सची संख्या आगामी काळात वाढविण्यात येणार आहे.

कारागृहात सुधारणा करणार

Advertisement

कायद्यानुसार बंद्यांना ज्या साेयी सुविधा देणे बंधनकारक आहे, त्या देण्याबाबत काटेकाेरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. कारागृहातील सर्व कैद्यांची वैद्यकीय चाचणी जसे की, रक्तचाचणी, ईसीजी, शुगर, युरिन आदी 10 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. ज्या बंद्यांना हदयविकार, टीबी, एडस असे आजार आहेत त्यांच्याकडे अधिक लक्ष्य पुरविण्यात येईल. ज्या कारागृहात महिला बंदी ठेवण्यात येतात अशा कारागृहांना 15 फेब्रुवारी पर्यंत पाळणाघर सुरु करण्यास सांगण्यात आले.

अन्नधान्य खाण्यायाेग्य प्रतीचे ठेवा

Advertisement

कैद्यांच्या आहारातील अन्नधान्य हे खाण्यायाेग्य प्रतीचे असणे आवश्यक असून कारागृह उपहारगृहातून ज्या खाद्याेपयाेगी वस्तू विकल्या जातात त्यांचा दर्जा चांगला असावा अशा सूचना कारागृहांना देण्यात आलेल्या आहेत.

5 दिवसांत थंडी कमी होणार

Advertisement

पुढील पाच दिवसांत राज्यातील थंडी कमी होऊन किमान व कमाल तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी आहे. मात्र,आता उत्तरेतील पश्चिम चक्रावाताचा प्रभाव कमी होत आहे. त्यामुळे पुढील 5 दिवसांत म्हणजेच सोमवारपर्यंत थंडी कमी होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

संबंधित वृत्त

Advertisement

हवामान विभागाचा अंदाज

आज मध्य महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात थंडी टिकून आहे. उर्वरित राज्यात मात्र गारठा कमी झाला आहे. आज मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट होईल. तर, विदर्भ, कोकणासह मराठवाड्याच्या तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. वाचा सविस्तर

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement