नाशिक22 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
”मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना एवढेच म्हणेल की, तुम्ही त्र्यंबकेश्वर धुप प्रकरणात एसआयटी नेमा; पण ज्या लोकांनी राज्यभर मोर्चे काढून अश्लाघ्य भाषा वापरली त्यांच्या विरोधात काही तरी करा. त्या दहा बारा संघटना आहे, त्यांना कुठला फंड मिळतो, ते काय करतात लोकांना काय शिकवतात त्यांची चौकशी करा.” अशी मागणी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी केली.
हुसेन दलवाई आज त्र्यंबकेश्वर मंदीर परिसरात बोलत होते. जिथे वाद झाला त्या मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ जाऊन त्यांनी दर्शनही घेतले.यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
संदल आणला म्हणून राग
हुसेन दलवाई म्हणाले, ”धुप अर्पण करण्याची ही परंपरा फार मोठी आहे. गेल्या शंभर वर्षांपासून चालतो. बाबा शहा यांचा संदल येथे येतो ती चांगली गोष्ट आहे. धार्मिक सलोखा येथे आहे. ज्यांनी धुप अर्पण केला त्यांनी धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला नाही. याउलट जे धुप अर्पण करणाऱ्यांच्या विरोधात आहे आणि तेथे संदल आणला म्हणून ज्यांना राग आहे त्यांनी धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला.”
महाराष्ट्रात धार्मिक सलोखा बिघडवतात
हुसेन दलवाई म्हणाले, ”धार्मिक सलोखा बिघडवणारे केवळ त्र्यंबकेश्वरमध्येच नाही तर साऱ्या महाराष्ट्रात धार्मिक सलोखा बिघडवत आहेत. राज्यभर मोर्चे काढून धार्मिक सलोखा बिघडवला जात असून ते मोर्च्यात अश्लाघ्य भाषा वापरतात.”
देवेंद्र फडणवीसांना आव्हान
हुसेन दलवाई म्हणाले, ”मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना एवढेच म्हणेल की, तुम्ही एसआयटी नेमा पण ज्या लोकांनी मोर्चे काढून अश्लाघ्य भाषा वापरली त्यांच्या विरोधात काही तरी करा. त्या दहा बारा संघटना आहे, त्यांना कुठला फंड मिळतो, ते काय करतात लोकांना काय शिकवतात त्यांची चौकशी करा.”