‘त्या’ हल्ल्याचे विधिमंडळात पडसाद: पेपरफुटी, कॉपीप्रकार थांबले नाहीत, तर राज्याचे वाटोळे; विधानसभेत अजित पवारांचा संताप


मुंबई43 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पेपरफुटी आणि कॉपीचे प्रकार थांबले नाहीत, तर राज्याचे वाटोळे होईल, अशा शब्दांत गुरुवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. अहमदनगर आणि जालना जिल्ह्यातील कॉपीप्रकार गंभीर असल्याचा मुद्दा अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला.

Advertisement

विधिमंडळाच्या पायऱ्यावर महागाईविरोधात आंदोलन करून विरोधकांनी अधिवेशनाच्या आजच्या दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर सभागृहात विविध प्रश्नांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

पथकावर हल्ला

Advertisement

अहमदनगर जिल्ह्यातल्या टाकळी-मानूर (ता. पाथर्डी) येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपीचा प्रकार सुरू होता. येथे भरारी पथकाने छापा टाकला. मात्र, जमावाने कॉपी पुरवू द्या म्हणत या पथकावरच लाठ्या-काठ्या घेत हल्ला केला. दगडफेक झाली. हा प्रकार सरकारने गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

पर्यवेक्षकांना धमकी

Advertisement

जालना येथील सेवली या जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रावरही असाच प्रकार घडला. विद्यार्थ्यांना कॉपी करू द्यावी म्हणून केंद्रचालक आणि पर्यवेक्षकांना धमकी दिली. राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षेत पेपरफुटी, कॉपीचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे शैक्षणित क्षेत्रात पिछेहाट होऊन राज्याचे वाटोळे होईल. हे पाहता सरकारने गंभीर दखल घेत कडक भूमिका घ्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

मुख्याध्यापकाला बेड्या

Advertisement

बारावीच्या पेपर फुटी प्रकरणी मुंबईच्या गुन्हे‎ शाखेच्या पथकाने नगर तालुक्यातील‎ रुईछत्तीसी येथील आनंद इंग्लिश विद्यालयातील‎ मुख्याध्यापकांसह पाच जणांना अटक केली आहे.‎ प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून तो सामाजिक‎ माध्यमातून पाठवून देऊन प्रत्येकांकडून दहा हजार‎ रुपयांना घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. तीच‎ प्रश्नपत्रिका मुंबईतील दादर येथील एका परीक्षा‎ केंद्रावर सापडल्याने हे प्रकरण समोर आले आहे.

अजब फॉर्म्युला

Advertisement

दहावीच्या परीक्षेला दोन विद्यार्थ्यांना‎ पास करून देण्यासाठी एजंटला पुणे‎ येथील महिला पालकाने तीस हजार‎ देऊनही हॉल तिकिटाचे कारण देता‎ परीक्षेला प्रवेश न दिल्याने‎ विद्यार्थ्यांच्या आईने पाथर्डी‎ बसस्थानकावर आर्त टाहो‎ फोडल्याने काहीकाळ गोंधळाची‎ वातावरण निर्माण झाले. यामुळे‎ जिल्ह्याबाहेरील विद्यार्थांना कॉपी‎ पुरवून पासिंगच फॉर्म्युला राबवणाऱ्या‎ एजंटचा गोरखधंदा उघड झाला.‎

एजंटाने पैसे उकळले

Advertisement

पुणे येथील या महिलेच्या दोन‎ मुलांना पाथर्डी येथील एका एजंटाने‎ दहावी परीक्षेत तुम्हाला कॉपी करून‎ पास करून देतो, असे सांगून‎ प्रत्येकी १५ हजार रुपये उकळले.‎ परंतु ऐनवेळी एकाच विद्यार्थ्यांचे‎ हॉल तिकीट आले व दुसऱ्याचे‎ आले नाही. त्यामुळे पुणे येथून‎ पाथर्डी येथे दोन दिवसांपासून तळ‎ ठोकून असलेल्या मातेच्या भावना‎ अनावर होऊन तिने पाथर्डी बस‎ स्थानकवासी एंटल्या नावाने टाहो‎ फोडल्याचे समोर आले होते.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement