‘त्या’ निर्दयी मातेस एक दिवसाची पोलिस कोठडी,: पत्नीने दोन चिमुकल्यांना विहिरीत फेकून दिले


नांदेड43 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

देगलूर तालुक्यातील गुत्ती तांडा येथील पतीसोबत झालेल्या वादात पत्नीने दोन चिमुकल्यांना विहिरीत फेकून दिले. निर्दयी माता पूजा आडेला देगलूर न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती मरखेल पोलिसांनी दिली.

Advertisement

पूजा व संतोष आडे या दांपत्याला सिद्धार्थ (३) व मुलगी फुंदी (४ महिने) अशी दोन अपत्ये होती. संतोष आडे हैदराबाद येथे खासगी कंपनीत कामासाठी आहेत. दरम्यान, पती संतोष आडे संक्रांतीनिमित्त गावाकडे आले असता पत्नी पूजा आडेने पतीसोबत जाण्याचा आग्रह धरला. मात्र संतोषने नकार दिल्याने पूजाने रागात दोन्ही अपत्यांना विहिरीत फेकून दिले होते.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement