तेवतीयाच्या गेम चेंजर खेळीने लखनऊला सुपर जायंट्सला आसमान दाखवत केले चीत

तेवतीयाच्या गेम चेंजर खेळीने लखनऊला सुपर जायंट्सला आसमान दाखवत केले चीत
तेवतीयाच्या गेम चेंजर खेळीने लखनऊला सुपर जायंट्सला आसमान दाखवत केले चीत

शेवटच्या षटकात अभिनव सतरंगानीने सलग दोन चौकार मारत ५गडी राखत विजय नोंदवला. आवेशने मिलरला १८व्या षटकात पॅव्हेलियनमध्ये पाठवत सामन्यात रंग भरला. एका बाजूला पूर्णपणे गडी बाद होत असताना तेवतीयाने गुजरातच्या आशा पल्लवित ठेवल्या. त्याने २४ चेंडूत ४० धावा केल्या. सामनावीराचा पुरस्कार मोहम्मद शमीला देण्यात आला. गुजरात टायटन्सला ७८ च्या स्कोअरवर चौथा धक्का बसला. दीपक हुड्डा फलंदाजीनंतर गोलंदाजीतही चमत्कार करताना दिसला. त्याने १२व्या षटकात मॅथ्यू वेडला क्लीन बोल्ड केले. वेडला २९ चेंडूत ३० धावा करता आल्या. १२ षटकांनंतर गुजरातने ४ गड्यांच्या मोबदल्यात ७९ धावा केल्या होत्या.

४ बाद २९ धावांवरून लखनौ सुपर जायंट्सचे सॉलिड कमबॅक करत दीपक हुडा आणि आयूष बदोनींनी गुजरातला हैराण केले. मोहम्मद शमीने लखनऊ सुपर जायंट्सच्या आघाडीच्या फलंदाजांना माघारी पाठवून गुजरात टायटन्सला सामन्यावर पकड मिळवून दिली. पण, दिपक हुडा व आयूष बदोनी या जोडीने लखनौ सुपर जायंट्सचा डाव सावरला. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याला १३९kmph च्या वेगाने गोलंदाजी करताना आनंद झाला, परंतु लखनौच्या सेट झालेल्या जोडीने त्याच्या चार षटकांत ३७ धावा चोपल्या. लखनौने आव्हानात्मक लक्ष्य उभे केले.

Advertisement

मोहम्मद शमीने तीन विकेट्स घेत लखनौची अवस्था ४ बाद २९ अशी केली होती. कर्णधार लोकेश राहुल ( ०) पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर क्विंटन डी कॉक ( ७), एव्हिन लुईस ( १०) व मनीष पांडे ( ६) हे झटपट माघार परतले. हुडा व बदोनी यांनी लखनौच्या डावाला आकार दिला आणि ६८ चेंडूंत ८७ धावांची भागीदारी केली. हुडाने ३६ चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याला राशिद खानने पायचीत केले. हुडा ४१ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५५ धावा करून माघारी परतला. बदोनीने दमदार खेळ सुरू केला, शमीने टाकलेल्या १८व्या षटकात फर्ग्युसनने त्याचा झेल सोडला.

Advertisement

शमीने ४ षटकांत २५ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. शमीने टाकलेल्या १८व्या षटकात बदोनीने १५ धावा कुटल्या. बदोनीने षटकार खेचून पदार्पणातील अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३८ चेंडूंत ही खेळी साकारली. आयपीएल पदार्पणात ६व्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन अर्धशतक झळकावणारा बदोनी हा पहिलाच फलंदाज ठरला. २०व्या षटकात बदोनी बाद झाला. त्याने ४१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावा केल्या. राशिद खान व ल्युकी फर्ग्युसन सारख्या अनुभवी गोलंदाजांना त्याने आत्मविश्वासाने षटकार खेचले. लखनऊ सुपर जायंट्सने ६ बाद १५८ धावा केल्या.

Advertisement