“तुझे मत व्यक्त करणे आमच्यासाठी…”; अभिनेता सिद्धार्थने केलेल्या अश्लील टिकेवर सायनाच्या पतीची प्रतिक्रिया


स्टार बॅडमिंटनपटू असण्यासोबतच सायना नेहवाल भारतीय जनता पक्षाची सदस्य देखील आहे.

Advertisement

बॉलिवूड आणि अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता सिद्धार्थ स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने चांगलाच फसल्याचे दिसत आहे. हे प्रकरण इतके टोकाला गेले आहे की, राष्ट्रीय महिला आयोगाने सिद्धार्थविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही सिद्धार्थच्या या ट्विटचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी, “कोणीही असे शब्द वापरणे हे पूर्णपणे अस्वीकार्य आणि असभ्य भाषा आहे. काहीही झाले तरी भाषेत सभ्यता असली पाहिजे, असे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींनंतर ५ जानेवारी रोजीच्या सायना नेहवालच्या ट्विटवर सिद्धार्थने प्रतिक्रिया दिली होती. सायनाच्या या ट्विटवर अभिनेता सिद्धार्थने दुहेरी अर्थाचा शब्द वापरला आहे. “S****e c**k जागतिक विजेती नशिब आपल्याकडे भारताचे संरक्षण करणारे आहेत. #Rihanna तुला लाज वाटली पाहिजे.” असे अभिनेता सिद्धार्थने म्हटले आहे.

Advertisement

तत्पूर्वी, सायनाने ट्विट करून पंजाबमध्या प्रकरणावरुन भाष्य केले होते. “कोणतेही राष्ट्र स्वत:च्या पंतप्रधानांच्या सुरक्षेशी तडजोड करत असेल तर ते सुरक्षित असल्याचा दावा करू शकत नाही. मी अराजकवाद्यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करते,” असे सायनाने म्हटले होते. स्टार बॅडमिंटनपटू असण्यासोबतच सायना भारतीय जनता पक्षाची सदस्य देखील आहे.

त्यानंतर बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपने सोमवारी ट्विटरवर अभिनेता सिद्धार्थने त्याची पत्नी आणि स्टार शटलर सायना नेहवालबद्दल केलेल्या लैंगिक टिप्पणीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारी एका ट्विटमध्ये सिद्धार्थला टॅग करताना पारुपल्ली कश्यपने,”तुझे मत व्यक्त करणे आमच्यासाठी अस्वस्थ करणारे आहे, पण चांगले शब्द निवडा यार. मला वाटते की तुला असे बोलून छान वाटले,” असे म्हटले आहे.

Advertisement

सायनाच्या ट्विटवर सिद्धार्थने दिलेल्या प्रतिक्रियेने वादाला तोंड फुटले आहे. अभिनेता सिद्धार्थच्या या ट्विटवर लोकांनी आक्षेप घेत महिला आयोगाकडे तक्रार केली. सिद्धार्थला महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. तसेच आयटी कायद्यांतर्गत सिद्धार्थविरुद्ध गुन्हा नोंदवण्यास सांगितले आहे. इतकेच नाही तर महिला आयोगाने ट्विटरला हे ट्विट काढून टाकण्यास सांगितले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने याप्रकरणी मुंबई पोलीस आणि ट्विटरकडून अहवाल मागवला आहे.

अभिनेता सिद्धार्थचे स्पष्टीकरण

Advertisement

वाद वाढल्यानंतर सिद्धार्थनेही स्पष्टीकरण दिले आहे. त्यांचा म्हणणे चुकीच्या पद्धतीने घेतले जात आहे, कोणाचाही अपमान करण्याचा प्रयत्न केलेला नाही, असे सिद्धार्थने म्हटले आहे.

काय म्हणाली सायना?

Advertisement

याप्रकरणी सायनानेही प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, “त्याला (सिद्धार्थ) काय म्हणायचे होते ते मला माहित नाही. एक अभिनेता म्हणून मी त्याच्यावर प्रेम केले पण हे (ट्विट) चांगले नव्हते. तो स्वत:ला चांगल्या शब्दात व्यक्त करू शकतो पण पण मला वाटते की हे ट्विटर आहे आणि अशा शब्दांनी आणि टिप्पण्यांद्वारे तुमची दखल घेतली जाईल.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Advertisement

Source link

Advertisement