तिसऱ्या लाटेची चाहूल: मुंबईची लोकल बंद करण्याचा सध्या कोणताही विचार सरकारसमोर नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती


Advertisement

मुंबई19 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

देशभरासह राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. देशातील इतर राज्यांमध्ये कठोर निर्बंध लावण्यात आले आहे. दरम्यान राज्यातही कठोर निर्बंध लावण्याविषयी चर्चा सुरू आहे. यावेळी मुंबईची लोकल पुन्हा बंद केली जाणार का? अशा चर्चा सुरू आहे. यावर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टच सांगितले आहे.

Advertisement

मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांवर सध्या तरी कोणतेही निर्बंध लागू करण्यात येणार नाहीत. अशी माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थांकडून मिळाली होती. आता या वृत्ताला राजेश टोपे यांनीदेखील दुजोरा दिला आहे. मुंबईची लोकल सध्या बंद करण्याचा कोणताही विचार सरकारसमोर नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी जिल्हांतर्गत बंदी लावण्याचाही राज्य सरकारचा कोणता विचार नाही अशी माहिती दिली. यासोबतच तूर्तास लॉकडाऊन लावण्याविषयी देखील कोणताही विचार नसल्याचे ते म्हणाले आहेत.

दरम्यान राज्यात बुधवारी 26,538 लोक संक्रमित आढळले आहेत. 5331 लोक बरे झाले आणि 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात 67.57 लाख लोक संक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. यामध्ये 65.24 लाख लोक बरे झाले आहेत. तर 1.41 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. 87, 505 रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement