तळेगाव4 तासांपूर्वी
Advertisement
- कॉपी लिंक
परंपरा लाभलेल्या तळेगाव दशासर येथील शंकरपटाला नऊ वर्षांनंतर रविवारी (दि. १५) दो-दाणी शर्यतीपासून सुरूवात झाली. २० जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या शंकरपटाचा पहिला दिवस शिव-जाधव, शिवा- संभा, शिवा-संग्राम या बैलजोडींनी गाजवला.
Advertisement
यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील नांद सावंगी येथील मंगेश सरोकार यांच्या शिव-जाधव या बैलजोडीने १२.१५ सेकंदात अंतर पार करून प्रथम क्रमांक पटकावला, तर जालना जिल्ह्यातील कानजोडी येथील बंडू चव्हाण यांच्या शिवा-संभा यांच्या जोडीने १२.७४ सेकंदात अंतर पार करून द्वितीय, तर धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेंदुरजना खुर्द येथील राजू देशमुख यांच्या शिवा-संग्राम या बैलजोडीने १२.८६ सेकंदात अंतर पार करून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
Advertisement
बातम्या आणखी आहेत…
Advertisement